चोपडा महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 128 वी जयंती साजरी

 चोपडा महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 128 वी जयंती साजरी


चोपडा दि.२४(प्रतिनिधी) दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालय चोपडा या ठिकाणी वाणिज्य विभागाचे वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमा प्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी .ए .सूर्यवंशी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. के . एन.सोनवणे ,उपप्राचार्य डॉ. आर. एम. बागुल ,उपप्राचार्य डॉ. ए .बी .सुर्यवंशी तसेच डॉ. डी .एस .पाटील ,डॉ. ए .एच. साळुंखे हे उपस्थित होते .कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सदर कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला विभाग प्रमुख डॉ. सी .आर. देवरे यांनी प्रास्ताविक करताना नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बद्दल महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेला हा थोर माणूस परंतु अतिशय जहाल मतवादी व्यक्तिमत्व असणारा माणूस यांनी इंग्रजांच्या विरोधात ठामपणे जाऊन तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा ,तसेच जय हिंद ची घोषणा करत आझाद हिंद सेने ची स्थापना केली अशा या महान व्यक्तीस आपल्या प्रास्ताविक मधून अभिवादन केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधून  परेश पाटील,  श्रद्धा वाणी, नंदिनी पाटील व हर्षल चौधरी  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य . डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून व्हाट्सअप वर वेळ घालविण्यापेक्षा जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केले तर आपणास जास्तीत जास्त विषयाचे ज्ञान व महापुरुषांबद्दलची माहिती मिळेल व त्यातून आपल्या विकासास चालना मिळेल असे मत व्यक्त केले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी.पी .बाविस्कर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पी. आय. जैन, प्रा. सौ. एच. सी देवरे,  डॉ.एन.सी.पाटील ,प्रा. मिस. भाविका गुजराती,मिस .योगिनी पाटील,श्री.जीवन बागुल यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने