राज्यस्तरीय वाणिज्य व व्यवस्थापन प्रश्नमंजुषा स्पर्धेत चोपडा महाविद्यालय उपविजेता पदी विराजमान

 राज्यस्तरीय वाणिज्य व व्यवस्थापन प्रश्नमंजुषा स्पर्धेत चोपडा महाविद्यालय उपविजेता पदी विराजमान


चोपडा दि.२४(प्रतिनिधी)आज दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी बीपी आर्ट्स ,एसएमए सायन्स अँड के के सी कॉमर्स कॉलेज चाळीसगाव  येथे 21 वी डॉ. एम बी पाटील राज्यस्तरीय वाणिज्य व व्यवस्थापन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा ही वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील   विद्यार्थ्यांसाठी होती. सदर स्पर्धेमध्ये एकूण 24 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वेगवेगळे राऊंड  द्वारे विद्यार्थ्यांची  स्पर्धा घेण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये एकूण पाच संघ हे फायनल राऊंड साठी पात्र झाले होते. पैकी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश  जी पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यानी द्वितीय क्रमांक मिळवून उपविजेता पद मिळविले . उपविजेता संघास रुपये 3000 रोख रकमेचे पारितोषिक तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या संघात दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे विद्यार्थी कुमारी. गायत्री मनोज धनगर (M.Com.I), कु. परेश विश्वनाथ पाटील (TYBCOM) व कुमारी. सिया हरिश्चंद्र अग्रवाल (SYBCOM ) या विद्यार्थ्यांनी संघामध्ये सहभाग घेतला होता. या ठिकाणी संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. प्रवीण इंदरचंद जैन  यांनी काम पाहिले. तसेच विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेसाठी विभाग प्रमुख डॉ. सी. आर . देवरे यांनी तसेच विभागातील सर्व प्राध्यापक वृंद यांनी मार्गदर्शन केले.  विद्यार्थ्यांच्या या यशासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील तसेच उपाध्यक्षा श्रीमती .आशाताई विजय पाटील, सचिव ताईसाहेब.डॉ.सौ. स्मिता संदीप पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी . ए.सूर्यवंशी , उपप्राचार्य डॉ. के. एन .सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए. बी. सुर्यवंशी , उपप्राचार्य डॉ. आर.एम. बागुल, समन्वयक डॉ. एस. ए .वाघ यांनी तसेच सर्व प्राध्यापक वृंद ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने