राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या हस्ते आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा सत्कार

 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या हस्ते  आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा सत्कार

मुंबई दि.२४ : अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम यांचे वतीने चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार  प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचा  राज्यपाल  श्री. सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या हस्ते  स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. 

 वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र यांच्या वतीने नव निर्वाचित जनजाती खासदार व आमदार यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमास सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.त्यात चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महामहीम राज्यपाल  श्री. सी.पी.राधाकृष्णन , आदिवासी विकास मंत्री  ना. श्री. अशोकजी उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री  ना. श्री. नरहरी झिरवाळ , अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे राष्ट्रीय अध्यक्ष  श्री. सत्येंद्र सिंह तथा  विधिमंडळाचे  सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने