नैराश्य एक सामाजिक समस्या : डॉ. सी.डी.खर्चे
मुक्ताईनगरदि.२६ (प्रतिनिधी सतीश गायकवाड )खडसे महाविद्यालयात नैराश्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले हे व्याख्यान मानस रंग क्लब व समुपदेशन मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सी.डी.खर्चे या होत्या त्यानी अध्यक्ष भाषणात मनोगत व्यक्त करताना आजच्या आधुनिक युगामध्ये लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत नैराश्य हे निर्माण झालेले आहे या नैराश्य पासून आपण मुक्ती मिळवणे गरजेचे आहे. आपल्या मानसिक भावना इतरांना व्यक्त करणे गरजेचे आहे त्यातून निराशाही कमी होऊ शकते असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. छाया ठिंगळे या होत्या. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नैराश्य हे एक सामाजिक समस्या होऊन बसलेली आहे. मुलांकडून आई-वडिलांच्या अवास्तव अपेक्षा चिंता मोबाईल वेगवेगळे गेम यामुळे विद्यार्थी हा गुरफटून गेलेला आहे मनासारख्या गोष्टी घडल्या नाही तर नैराश्य हे जन्म घेत असते यासाठी विद्यार्थ्यांनी ध्यान योगा व्यायाम चांगले चांगले पुस्तक वाचणे छंद जोपासणे मनातल्या भावना व्यक्त करणे यातून नैराश्य हे कमी होऊ शकते. कार्यक्रमाचे आभार डॉ. आर. डी. येवले यांनी केले. प्रा. संगीता देशमुख, बडे मॅडम, प्रा. हुसे तसेच बहुसंख्याने विद्यार्थी उपस्थित होते