सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम

 सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम 


भडगाव दि.२६(प्रतिनिधी)सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख  कला ,वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम विविध कार्यक्रमांनी संपन्न 

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार  सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भडगाव येथे 1 ते 15 जानेवारी 2025  दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा पंधरवडा  राबविला गेला. त्या अनुषंगाने भडगाव महाविद्यालया तील ग्रंथालय  विभागामार्फत वरील उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या उद्देशाने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. 

दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांनी ग्रंथालय स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. शेल्फ्स लावणे, पुस्तकांची स्वच्छता करणे आणि वाचकांसाठी आकर्षक वातावरण निर्माण करणे यासाठी मेहनत घेण्यात आली.

दिनांक 30 व 31 डिसेंबर 2024 रोजी दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शन महाविद्यालयात भरविण्यात आले होते .या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड (हिंदी विभाग प्रमुख )  यांनी केले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत पोलीस महिला श्रीमती सोनू सपकाळे, श्रीमती शमिना पठाण, अॅड. सुकन्या महाले ,उपप्राचार्य डॉ.डी.एम.मराठे , ग्रंथपाल आर.एम.गजभिये  , तसेच प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते .

दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सामूहिक वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड  होते  , ग्रंथपाल आर.एम.गजभिये  , प्रा. डॉ.एस.डी,भैसे (समन्वयक कला व वाणिज्य विभाग) .डॉ. ए. एम. देशमुख (मराठी विभाग प्रमुख ) डॉ. बी.एस. भालेराव (अर्थशास्त्र विभाग  प्रमुख ), प्रा. शिवाजी पाटील (इंग्रजी विभाग प्रमुख )  सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करावे व आपले बौद्धिक क्षमता विकसित करावी असे विचार आपले  अध्यक्षीय मनोगतातून  प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड  यांनी  मांडले .  विद्यार्थ्यांनी आवडीच्या पुस्तकांचे सामूहिक वाचन केले. यामुळे वाचनाची गोडी आणि एकत्रित वाचनाचा अनुभव मिळाला.

दिनांक 3 ते 7 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयातील विविध भाषा शास्त्रातील विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड (हिंदी विभाग प्रमुख ), डॉ. ए. एम. देशमुख (मराठी विभाग प्रमुख ), डॉ. ए. एन. भंगाळे वाचन संवाद उपक्रमांतर्गत लेखक व वाचक यांच्यात परिसंवाद आयोजित करण्यात आला. यामध्ये वाचन आणि लेखन प्रक्रियेच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. सर्व विद्यार्थीना वाचन व लेखन कसे करावे या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यशाळा संपन्न झाल्या नंतर विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाला भेट दिली व तेथील पुस्तक संग्रहालयातील पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी वाचन करून आनंद घेतला.

दि. 1 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत पुस्तक परीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदरील पुस्तक परीक्षण स्पर्धेत 18 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.त्यात प्रथम क्रमांक कु. देवयानी घटे , द्वितीय क्रमांक कु.दिपाली वाघ व तृतीय क्रमांक स्नेहल जगताप  यांची निवड करण्यात आली.  पुस्तक परीक्षणासाठी परीक्षक म्हणून अनुक्रमे प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड (हिंदी विभाग प्रमुख ), डॉ. ए. एम. देशमुख (मराठी विभाग प्रमुख ) यांचे सहकार्य लाभले. 

दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाची सांगता व समारोप करण्यात आला. प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्वाचे साधन असल्याचे सांगितले. तसेच ‘वाचन संकल्प महाराष्ट्र’ उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून बौद्धिक प्रगतीसाठी भक्कम पाया रचला. यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. वाचनाची गोडी, विचारमंथन, आणि सर्जनशीलता वाढीस लागल्याचे यामधून दिसून आले. विद्यार्थी, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

हे सर्व कार्यक्रम प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने  घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयातील वाचन संकल्प महाराष्ट्राच्या संयोजन समिती तसेच उपप्राचार्य डॉ.डी.एम.मराठे, ग्रंथपाल आर.एम.गजभिये विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर, या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील भाषा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे शेवटी सामूहिक राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. अशाप्रकारे महाविद्यालयात ग्रंथालयातर्फे विविध उपक्रम घेऊन वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम घेण्यात आला आहे. तसेच उपप्राचार्य डॉ.डी.एम.मराठे, ग्रंथपाल आर.एम.गजभिये यांनी या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने