अवैध वृक्षतोड वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी..वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन चालविल्याने जबर जखमी.. धडक कारवाईत सागवान लाकूड जप्त
चौगाव,ता.चोपडा दि.२६(विश्राम तेले) : नियतक्षेत्र चौगांव कक्ष क्र.२६० मध्ये अवैध वृक्षतोड करुन मोटार सायकल वर साग नग वाहतुक करणाऱ्या आरोपींना वन कर्मचाऱ्याने अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी इसमांनी त्यांच्या अंगावर वाहन चढवून जबर जखमी केल्याची घटना घडली.सदर घटनेतील आरोपीतांनी वापरलेली मोटार सायकल अंदाजीत रक्कम २५,०००/- नग-०१ स्टनर कंपनीची विना क्रमाकं विना चेचेस नंबर व साग नग ०८, घ.मी-०.१५१, मा.कि.३०५६/- मिळून आले मुददेमाल शासकीय वाहनाने मु.वि.केंद्र चोपडा येथे आणून जप्त करण्यात आला आहे. वनकर्मचारी श्री पाटील, यांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच श्री प्रथमेश वि.हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा व श्री. बी. के. थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रा) यांनी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे जावून श्री प्रकाश सुभाष पाटील, वनरक्षक चौगांव यांच्या तब्येतीची विचारपूस करुन नंतर रेंज स्टॉफ यांचेसह मौजे चौगांव गावापासून जवळच्या शेत शिवार भागात श्री. संजय प्रकाश कोळी, रा चौगांव यांना झडती वारंट बजावून त्यांचा घराची तपासणी केली असता त्यांच्या तळघरात कटाई मशीन -०१ व इतर लाकूड कटाई अवजारे अंदाजीत रक्कम १,००,८५० व साग नग ३५, घ.मी ०.३८४ व माल किंमत १०,७३८/- तयार पलंग नग १ (४x६) मिळून आले. एकंदरीत जप्त मुद्देमाल किंमत १,१४,६४४/- सदरचा माल जप्त करुन शासकीय वाहनाने मु.वि. केंद्र चोपडा येथे जमा केला.
सदरची कार्यवाही श्रीमती निनू सोमराज मॅडम, म.वनसंरक्षक धुळे (प्रा.) वनवृत्त धुळे, श्री.जमीर एम.शेख, म.उप वनसंरक्षक, यावल वनविभाग जळगांव, व श्री. आर. आर. सदगीर, म. विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रथमेश वि.हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या उपस्थितीत श्री. बी. के. थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रा), श्री. आर.एस.मोरे, वनपाल सत्रासेन, श्री. अमोल पाटील, वनपाल लासुर (अ.कार्य) श्री. शुभम पाटील, वनरक्षक लासुर, श्री. रोहित पावरा, वनरक्षक मोरचिडा, श्री. प्रकाश पाटील, वनरक्षक चौगांव, श्री. शालीग्राम कंखरे, वनरक्षक अंधारमळी, श्री संदिप पावरा वनरक्षक, श्री जनार्दन गुटटे, वनरक्षक पळासदरा, श्रीमती रिला पावरा, वनरक्षक सत्रासेन, श्रीमती सरला भोई, वनरक्षक लासुर उत्तर, श्रीमती सोनाली पावरा, वनरक्षक उमटी, श्रीमती अनिता बारेला, वनरक्षक श्रीमती पिंकी कोठारी, वनरक्षक, श्रीमती पोप्या बारेला, वनरक्षक श्री गोविंदा चौधरी व मदन मराठे वाहन चालक तसेच मनोज मोरे, रावा कोळी, रवि भिल व रतिलाल भिल, भुरसिंग बारेला, वनसेवक यांनी केली.