वंदे मातरम् ने दुमदुमली चोपडा नगरी!अभाविपने प्रजासत्ताक दिनानिमित्त काढली तिरंगा पदयात्रा

 वंदे मातरम् ने दुमदुमली चोपडा नगरी!अभाविपने प्रजासत्ताक दिनानिमित्त काढली तिरंगा पदयात्रा

चोपडा,दि.२६(प्रतिनिधी) - प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चोपडा शाखेतर्फे ५०० फूट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमात ३०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

या पदयात्रेत भारतीय सेनेचे माजी सैनिक, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, प्रदेश मंत्री वैभवी ढीवरे, विभाग संयोजक भाविन पाटील, जिल्हा संयोजक तेजस पाटील, शहर मंत्री मुकेश बडगुजर, कार्यक्रम प्रमुख हर्षल जगताप, हर्षल पाटील, साक्षी गुजराथी, मनीष गुजराथी, अनिल वानखेडे, गजेंद्र जैस्वाल, सागर नेवे, गौरव सोनार, गणेश पारधी, चेतन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन नमन पाटील यांनी केले.

पदयात्रेची सुरुवात शासकीय विश्रामगृहापासून झाली. भारत मातेच्या जयकाराच्या घोषणा देत गांधी चौक चोपडा येथे समाप्ती करण्यात आली.प्रदेश मंत्री वैभवी ढीवरे यांनी अभाविपची विस्तृत मांडणी केली आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने