चोपड्याचे कलाकार अनिलराजे पाटील यांचे चित्र औंधच्या हेरिटेज आर्ट गॅलरी प्रदर्शनात निवड
चोपडा दि.३(प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रांना नावलौकिक मिळवून चोपडा नगरीचे नाव कानाकोपऱ्यात नामांकित चित्र कलाकार अनिलराज पाटील यांच्या शिवांश या चित्राची सातारा येथील औंधच्या हेरिटेज आर्ट गॅलरीत निवड करण्यात आली आहे.यात महाराष्ट्रातील निवडक 40 चित्रकार सहभाही झाले आहेत.
हे ऑफलाईन चित्र प्रदर्शन लवकरच सुरु होणार आहे.हे चित्र प्रदर्शन 90 दिवस असणार आहे . चित्रकार अनिलराजे पाटील यांना या आधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते सद्या घरातील वॉल पैटिंग, शाडू माती गणेश मूर्ती, मंदिरातील जुन्या देवताच्या मूर्ती रंगकाम सजावट, महापुरुषा च्या मूर्ती रंग काम करीत आहेत.तसेच नगर पालिका स्वच्छता अभियान चित्र पोस्टर भिंती रंगविने हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.त्यांच्या रंगविलेल्या भिंती वरील बोलक्या चित्रांनी शहराच्या सौंदर्यात भर पडल्याने नागरिकांनी त्यांच्या कार्याची वाह व्वा केली आहे