चोपडा कन्या विद्यालयात सावित्री बाई फुले जयंती व बालिका दिवस साजरा
चोपडा दि.३(प्रतिनिधी)सद्गुरु शिक्षण मंडळ संचालित प्राथमिक कन्या विद्यालय चोपडा या शाळेत क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती व बालिका दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.
सावित्रीबाई यांच्या जीवन कार्याविषयी श्रीमती निता पावरा यांनी माहिती दिली . हर्षल पाटील, निलेश पाटील, यज्ञेश लोहार यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वेशभूषेत तर हर्षाली मोतीराळे , व आकांशा साळुंखे यांनी सावित्रीची महती गीतातून सादर केली. तसेच लावण्या मराठे ,सिद्धी लोहार, वैदवी पाटील ,फाल्गुनी पाटील ,माहेश्वरी पाटील, साक्षी नेरपगार ,साक्षी चित्रकथी, रितिका सुतार हिरण्या पाटील परी पाटील ,लावण्या पाटील, उर्मी पाटील ,योगिनी व योगेश्वरी पाटील ,आकांक्षा साळुंके, चेतना चौधरी, निहारीका चौधरी, युविका चौधरी, रोशनी चित्ते, भूमी पाटील, खुशी देशमुख, प्राची पाटील ,आलिया बागवान यज्ञा देशमुख या विद्यार्थिनी सावित्रीबाईच्या वेशभूषा करून आल्या होत्या त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी भाषणे दिली. सर्व शिक्षकांनी मुलींना गुलाबपुष्प देऊन गौरव केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रमोद पाटील तर सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. श्यामसुंदर पाटील यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी कांता पाटील, आशा बारी नांजुका पाटील यांनी परिश्रम घेतले.