अमेरिकेत कंपनी कामगाराचा मृत्यू चोपडा तालुक्यातील वेलेगावात हलकल्लोड...

 अमेरिकेत कंपनी कामगाराचा मृत्यू चोपडा तालुक्यातील वेलेगावात हलकल्लोड...

चोपडा,दि. (प्रतिनिधी)--तालुक्यातील वेले गावचे मूळ रहिवासी हल्ली मुक्काम वडगाव बुद्रुक सिंहगड रोड, पुणे येथे वास्तव्याला असलेले कंपनी कामगार, मेकॅनिकल इंजिनियर सोमनाथ धर्मा पाटील यांचा अमेरिकेत मृत्यू झाला. ही वार्ता जेव्हा वेले गावात आली. त्यावेळी मात्र संपूर्ण गावा वर शोककळा पसरली आहे.

वेले गावचे, सोमनाथ धर्मा पाटील वय 37 हे रोबोटिक विप्रोपारी या कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कामाला होते. पुण्यातील सिंहगड परिसरात ते राहत होते. त्यांना पत्नी दोन मुलगे, तीन बहिणी आई वडील असा परिवार असताना, कंपनी कामानिमित्त ते अमेरिकेतील मेक्सिको शहरात गेलेले असताना दिनांक 30 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमाराला त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का लागला व ते एकटेच आपल्या रूमवर मृत अवस्थेत मिळून आले. कंपनीच्या वर्कर्स लोकांनी त्यांची चौकशी केली होती. त्यांनी त्यांच्या पत्नीला व आई-वडिलांना ही दुःखद वार्ता सांगितली तेव्हापासून या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकुलता एक मुलगा तो देखील अमेरिकेत गेलेला असताना त्याचे तेथे निधन होणे म्हणजे आता प्रेत येईपर्यंत व अंत्यविधी होईपर्यंत त्यांना अपरिमित दुःख झाले. कंपनी कामगारांनी मृत सोमनाथ यास मायदेशी जन्म गावी आणण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरी या बाबीला 48 तास उलटले असले तरी त्यांना अशी आशा आहे की आपल्या मुलाचे प्रेत आपल्या गावी दफन व्हावे व शेवटच्या क्षणी त्याचा चेहरा दिसावा म्हणून त्याची आई व बहिणी वडील शोक सागरात बुडाले आहेत. धर्मा पाटील हे वे ले गावात शेतीवाडी वर आपला चरितार्थ चालवत होते. आता केवळ सांत्वन करण्या इतकेच काय ते नातेवाईकांच्या हाती आहे.? सोमनाथ हा कंपनी कामगारातील उच्चश्रेणी कामगार होता. मेकॅनिकल इंजिनियर असून देखील तो अनेक देशांमध्ये कंपनी कामानिमित्त जात येत असे? त्याची पत्नी सौ कल्पना एक मुलगी व मुलगा पुणे येथील शाळेत शिकत आहेत. या घटनेमुळे वेले गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने