बी.फार्मसी महाविद्यालय चोपडा येथील विद्यार्थी केदार पालीवाल यांची आंतर विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड
चोपडा दि.३(प्रतिनिधी) :सन 1992 मध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील एनबीए (NBA) व नॅक मानांकित (NAAC Accreditated), आय एस ओ (ISO) प्रमाणित महाविद्यालय आहे. बी. फार्म अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता 100 जागांची आहे तसेच एम. फार्म फार्माकॉग्नोसी(Pharmacognosy) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यासाठी 10 जागांची प्रवेश क्षमताआहे व एम. फार्म फार्मास्युटिक्स (Pharmaceutics) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यासाठी 12 जागांची क्षमता आहे. तसेच एम. फार्म क्वालिटी ॲशयुरन्स (Quality Assurance) हा पदव्युत्तर पदवीअभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सुरू झालेला आहे. यासाठी 03 जागांची क्षमता आहे. पी.एच. डी अभ्यासक्रम पण महाविद्यालयात सुरू आहे. वर्ष 2020 यावर्षीपासून डिप्लोमा इन फार्मसी (D. Pharm) हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील फार्मसी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी कुमार केदार सूर्यकांत पालीवाल याची आंतर विद्यापीठ टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघातून तो महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
केदार पालीवाल याची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय अँड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदिप पाटील व उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील, प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे, रजिस्टार श्री प्रफुल्ल बी मोरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले. आंतर विद्यापीठ टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेसाठी तो कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ संघातून मध्यप्रदेश येथील अवादेश प्रताप सिंग विद्यापीठ रेवा येथे दिनांक 29 डिसेंबर ते 01 जानेवारी 2025. ला स्पर्धेसाठी जाणार आहे. या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या.