चोपडा मुकबधीर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिवस ’’ साजरा
चोपडा दि.३(प्रतिनिधी) :स्व.तुळसाआई बहुउद्देशीय महिला मंडळ , विटनेर संचालित मूकबधिर विद्यालय चोपडा येथेआज दिनांक ०३/१२/२०२४ वार - मंगळवार रोजी ‘‘ जागतिक दिव्यांग दिवस ’’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्था अध्यक्षा सौ लिलाबाई पाकळे यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान असलेले आण्णासाहेब श्री भावलाल पाकळे व श्री न्हाळदे भाऊसाहेब ( ग्रामसेवक ) उपस्थित होते .*
*प्रथम डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्षांनी व प्रमुख पाहुण्यांनी केले. तदनंतर कार्यक्रम अध्यक्षांचे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले.शाळेचे कला शिक्षक श्री निलेश महाजन , विशेष शिक्षक श्री राकेश पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता धनगर यांनी दिव्यांग मुलांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेचे भावलाल पाकळे यांनी दिव्यांग दिनाचे महत्व सांगून दिव्यांगांप्रति असलेले प्रेम व्यक्त करून सर्व शिक्षक - शिक्षकेतर कचाऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. जागतिक दिव्यांग दिना निमित्त ‘‘ दिव्यांग जनजागृती ’’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . रॅलीला हिरवा झेंडा दाखवून संस्था अध्यक्षांनी रॅलीचे उदघाटन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका श्रीमती अश्विनी पाकळे यांनी केले तर दिव्यांग दिनाबद्दल माहिती शाळेचे वाचा उपचार तज्ञ श्रीमती मिनाक्षी पाकळे यांनी सांगितली तर आभार प्रदर्शन वसतिगृह अधीक्षक श्रीमती वैशाली पाकळे मॅडम यांनी केले . सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.*