दिव्यांग बालकांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
चोपडा दि.१६(प्रतिनिधी) : धरणगाव ग्रामीण रुग्णालय ,वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव व विहान संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानेआज दिनांक 16डिसेंबर सोमवार रोजी शारीरिक व मानसिक दिव्यांग बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
यावेळी वर्ल्ड व्हीजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी जीतेन्द्र गोरे यांनी विवीध शासकीय योजना संदर्भात माहिती व आवश्यक असे मार्गदर्शन केले.तसेच सर्व बालकाचे दिव्यांग प्रमाण पत्र व UID कार्ड काढण्यासाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले शिबिरासाठी आलेल्या बालकांची आरोग्य तपासणी डॉ.एन डी महाजन यांनी केली तसेच डॉ. मयूर जैन सर यांनी दंत चिकित्सा संदर्भात समस्यांबाबत तपासणी केल्यात . तसेच नेत्र चिकित्सा संदर्भात श्री अभजित जोशी यांनी तपासण्या केल्यात.
कार्यक्रमाला आयसीटीसी विभाग व किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम विभाग समुपदेशक श्री. ज्ञानेश्वर शिंपी, श्री. गणेश कुंभार, वर्ल्ड व्हिजन सेवाभावी संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे, स्वयंसेवक आरती पाटील, रचना जाधव, जितेंद्र पाटील, विहान संस्थेच्या कार्यकर्त्या मीनाक्षी राणे , ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मोसिन शा, डॉ. हर्ष चौधरी, श्री. राजेश्वर काकडे , श्रीमती भाग्यश्री कांबळे, श्री. अतुल पाटील, श्री. प्रकाश चौधरी, मुख्य परीचारिका , श्रीमती दोरकर , श्रीमत दीपमाला भैसे, श्रीमती वर्षा गावीत , श्री.कुणाल चौधरी, श्री.किशोर शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.