नाशिकला भव्य कोळी समाज वधु वर परिचय मेळावा सोत्साहात.. दोन जोडप्यांचे कार्यक्रमातच जुळले तार.. खासदारांसह दिग्गजांची हजेरी

 

नाशिकला भव्य कोळी समाज वधु वर परिचय मेळावा सोत्साहात.. दोन जोडप्यांचे कार्यक्रमातच जुळले तार.. खासदारांसह दिग्गजांची हजेरी

नाशिक दि.१६(प्रतिनिधी): शहरातील श्रमिकनगर सातपूर  येथे प्रथमच  कोळी समाजाचा राज्यस्तरीय उपवर वधूवर परिचय मेळावा व युवामहोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
   नाशिक येथे वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन श्री नारायणदादा झगू कोळी (साकरीकर, भुसावळ )यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोळी महासंघाचे सरचिटणीस श्री. राजहंस टपके,श्री. देवानंददादा भोईर यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा.खासदार श्री.भास्करराव भगरे केले  तर
प्रमुख अतिथी म्हणून श्री. दिनकर आण्णा पाटील  (सभागृह नेते मनपा नाशिक), श्री. प्रविणजी देवरे (महसूल आयुक्त पुणे), श्री. अमोलभाऊ पाटील (संस्थापक अध्यक्ष उर्जा फाऊंडेशन नाशिक), सौ.कविताताई कोळी (अध्यक्षा पहिलवान गृप महाराष्ट्र राज्य), श्री. भगवानभाऊ कोळी (पीएसआय,मालेगाव),श्री. अर्जुनजी शिरसाठ(सामाजिक कार्यकर्ते नंदुरबार) हे मान्यवर उपस्थित होते.
या वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्याचा हेतू म्हणजे समाजातील रोटी बेटी व्यवहार,  विचारसरणी व मतभिन्नता दुर व्हावे व "एक तीर एक कमान सब कोळी एक समान या उद्देशाने आद्यकवी महर्षि वाल्मिकॠषी महाराजांच्या आशीर्वादाने सर्व महाराष्ट्रातील कोळी समाजाने एकत्र येऊन वधूवरांचा विवाह संबंध जमविण्यासाठी प्रयत्न करत आहे असे मार्गदर्शन श्री. नारायणदादा झगू कोळी साकरीकर यांनी प्रास्ताविकात   सांगितले. तसेच श्री. दिनकर आण्णा पाटील यांनी नाशिक येथील कोळी समाजाला महर्षी वाल्मिकॠषी मंदिर बांधून दिले व प्रत्येक सुख दुःखात नेहमीच साथ देण्याचे आश्वासन दिले.यानंतर तसेच श्री.प्रविणजी देवरे सौ.कविताताई कोळी, भगवानभाऊ कोळी (पीएसआय मालेगाव), यांची भाषणे होऊन अध्यक्षीय भाषणात कोळी महासंघाचे सरचिटणीस  श्री राजहंस टपके  समाजाबद्दल अतिशय सुंदर विचार मांडले.
विशेष म्हणजे या वधूवर परिचय मेळाव्यात आलेल्या उपवर वधूवरांनी आपला परिचय करून दिला. व यातील दोन विवाह याच कार्यक्रमात जुळवून आले.तर ४ते ५ विवाह जमविण्यासाठी बोलणी सुरु आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजयदादा शिंदे, व श्री. जिवन सोनवणे यांनी  वधूवरांचा परिचय करून दिला .या वधूवर परिचय मेळावा समितीचे अध्यक्ष श्री. कमलेश रायसिंग,श्री. निलेश सैंदाणे-उपाध्यक्ष, श्री. प्रकाश कोळी, श्री. उल्हास सोनवणे,श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, सौ.कल्पना कोळी, श्री. भगवान ठाकरे, तसेच मार्गदर्शक-श्री. युवराजदादा सैंदाणे, श्री नितिनजी शेवरे, श्री. किसनभाऊ सोनवणे, श्री. सुदाम चव्हाण, श्री. सुरेश निकम, श्री. साहेबराव वाघ, श्री. नाना मोरे, श्री. मधुकर शेवरे, श्री. दिलीप सैंदाणे यांच्यासह श्रमिकनगर सातपूर कोळी समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतले. व श्री. गणेश राजकुवर (कोळी महासंघ जिल्हा अध्यक्ष नाशिक यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने