तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते धरणगावला बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन..
धरणगाव दि.१६(प्रतिनिधी)तहसील कार्यालय,आरोग्य विभाग व वर्ल्ड व्हिजन इंडिया धरानगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक16/12/2024 रोजी धरणगांव तालुक्यात बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन करण्यात आले.
जळगाव जिल्हाअधिकारी श्री.आयुष प्रसाद व श्री. मनीष कुमार गायकवाड -( प्रान्त)उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये धरणगाव तहसीलदार श्री. महेन्द्र सूर्यवंशी - यांच्या शुभहस्ते बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळीगट शिक्षण अधिकारी सौ. भावना भोसले यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा -2006 ची चळवळी. या बाल विवाह थांबविणे व लोकांमध्ये जन जागृती निर्माण करणे व जे गावतील लोक बाहेर गावी कामाला जातात, ज्या बालकांनी शाळा सोडले असेल किवां अति गरीब कुटुंबा कड़े जास्त लक्ष देणे व त्यांना जागृत करणे त्याच प्रमाणे लोकांना शिक्षे बाबत सांगने असे काही ही घडले तर त्वरित रिपोर्ट करणे आदी विषयांवर मार्गदर्शन करून बाल विवाह चे मुख्य कारण गावात उच्च शिक्षणाची कमतरता व त्यामुळे मुले शाळा सोडतात व बाल विवाह ला बड़ी पडतात असे स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे श्री. जीतेन्द्र गोरे -प्रकल्प अधिकारी वर्ल्ड विज़न इंडिया धरणगाव यांनी बाल विवाह प्रतिबन्ध कायदा 2006 चे पालन कसे करता येईल व कोणतेही मुले हे बाल विवाह ला बळी पड़ल्यास कोणती तरतूद करावी व 1098 आणि 112 हेल्पलाइन वर कॉल करने व कार्यक्रम चा आराखड़ा आपल्या भाषाणात सांगितले . तसेच आपले अनुभव सांगून आपण सर्व मिळून बाल विवाह सारखे वायरसाला मात देऊ शकतो.असे सांगितले.
गुड़ टच ब्याड टच बाबत डॉ. संजय चौहान यानी मार्गदर्शन केले व शासनाची योजना किशोरी बालिकासाठी राबवित असताना बाल विवाह बद्दल आशा यांच्या माध्यमाने जागृत करणार आहेत यावेळी.इवाक कॅम्पियान चे उद्घाटन करण्यात आले.
वर्ल्ड व्हीज़न इंडिया च्या माध्यमाने शपथ विधि घेण्यात आली शेवटी हस्ताकक्षर अभियान राबविण्यात आले व उपस्थित सर्व लोकानी हस्ताकक्षर करुंन वचन दिले व वर्ल्ड व्हीजन इंडिया च्या माध्यमाने प्रत्येक गावात बाल विवाह प्रतिबन्ध पोस्टर मा. श्री. महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते सर्व आशा सेविकांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमात धरणगाव तालुक्यातील तहसीलदार,गट विकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी व टीम,पोलिस उप निरीक्षक अधिकारी,गट शिक्षा अधिकारी,सीडीओ, वर्ल्ड व्हीज़न इंडिया चे समस्त टीम व धरणगाव तालुक्यातील समस्त आशा संयोगनी व सुपरवाइजर मोठया संख्यत उपस्थित होते.
.