खेडी भोकरी येथिल शेतात गावठीसह जंगली डूकरांचा हैदोस......शेतकऱ्याचे झालेल्या हजारो रूपयाचे नुकसानाला जबाबदार कोण ?
चोपडा,दि.१८ (वार्ताहर) तालुक्यातील खेडी भोकरी येथिल गावानजीकच्या केळीच्या शेतात गावातील गावठीसह ,जंगली डूकरांचा खूप त्रास होत आहे केळीचे रोपांची रोजच्यारोज नुकसान होत केळीचे मुळासकट उपडून फेकुन देत आहे त्यामुळे तरी यांच डूकंराचे खेडीभोकरी गावठाण आणि गावात सोडले आहेत वारंवार तक्रार देवूनही हजारो रुपयांचे नुकसान होत आहे तरी संबंधितांनी याची चौकशी करून नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.शेतकरी हा हवालदिल झालेला असतो आणि डूकरावर लवकरात लवकर बंदोबस्त आणावा अशी मांगणी शेतकऱ्यानी केली आहे. शेतकऱ्यांचे केळी पिकासाठी लागणारे खर्च आणि आता ती केळीचे रोपटे मोठे झाल्यावर असे नुकसान होत असेल तर शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.
कडाक्याच्या थंडी पडत असताना दिवसा ही आणि रात्र पाळी देखील पिकाची राखण करण्यासाठी जायचे शक्य नाही अतोनात नुकसान होत आहे तरी ह्या नुकासाणिची भरपाई मिळावी .अशी नुकसान ग्रस्त शेतकरी आनंदा महारु पाटील जेष्ठ पत्रकार यांनी केले आहे.