पंकज महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा
चोपडा दि.१८(प्रतिनिधी) :पंकज महाविद्यालय चोपडा येथे १८ डिसेंबर २०२४ रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे तर मार्गदर्शक डॉ संजय पाटील होते.
स्वागत व सत्काराने सदर कार्यक्रमाचे सुरुवात झाली. डॉ संजय पाटील यांनी आपल्या मनोगतातून अल्पसंख्यांक हक्क दिनाचे महत्त्व सांगताना सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला. त्यानुसार अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांची संस्कृती भाषा धर्म परंपरा इत्यादींचे संवर्धन करण्यात यावे या दृष्टीने त्यांच्यात जनजागृती व्हावी या उद्देशाने आजचा दिवस साजरा करण्यात येतो असे सांगितले. तर अध्यक्ष मनोगतातून प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे यांनी अल्पसंख्यांक हक्क दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच अल्पसंख्यांकांच्या भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन व्हावे असे देखील सांगितले. या प्रसंगी सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ किशोर पाठक यांनी मानले.