आपल्या आई-वडिलांना विसरू नका; त्यांचा आदर करा : प्रा. वसंत हंकारे...

 आपल्या आई-वडिलांना विसरू नका; त्यांचा आदर करा : प्रा. वसंत हंकारे...

  चोपडादि.१३( प्रतिनिधी):- आई - वडिलांची काळजी घ्या; त्यांचा आदर करा. वेळ निघून गेल्यावर उपयोग होत नाही. ज्या आई-वडिलांनी २० वर्षे मुलींचा सांभाळ केला त्या मुली दोन दिवसांच्या प्रेमाखातर आई-वडिलांना विसरून जातात. आई-वडिलांना विसरू नका. जीवनात आई-वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण असते, अनाथांकडून जाणून घ्या,’ असे प्रतिपादन व्याख्याते व प्रबोधनकार प्रा. वसंत हंकारे यांनी केले.

   पंकज बोरोले यांच्या वाढदिवस निमित्त आयोजित पंकज विद्यालयाच्या प्रांगणात  ' जगू या आनंदाने' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

   प्रा वसंत हंकारे यांनी सामाजिक व ऐतिहासिक उदाहरणे देऊन आई-वडिलांचे महत्त्व, सोशल मीडियाचा सदुपयोग कसा करावा, मोबाइलचा दुरुपयोग कसा टाळावा, या संदर्भात प्रबोधन केले. त्यांचे व्याख्यान ऐकून उपस्थित तरुण-तरुणी भावूक झाले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले होते. तर व्यासपीठावर प्रा. चंद्रकांत सोनवणे ( आमदार - चोपडा विधानसभा मतदार संघ ) , माजी आमदार कैलास पाटील, घनशाम अग्रवाल (संचालक  - जे डी सी सी बँक जळगाव ) , डॉ विकास हरताळकर, इंदिराताई पाटिल , विजयाताई पाटील, घनशाम निंबाजी पाटिल , विकास पाटिल, अविनाश राणे , गोकुळ भोळे,हेमलता बोरोले , दिपाली बोरोले आदि मान्यवर होते.

   आई-वडिल व शिक्षक हे दैवत असून, सर्व समाजात प्रबोधन व्हावे. जीवनामध्ये संस्कार महत्त्वाचे असून, त्यातून परिवर्तन होण्याची गरज आहे. आई-वडिलांचा संघर्ष, कष्ट याची जाण असली पाहिजे, असेही ते म्हणाले‌.

  तुमचं वय आहे का विवाह करायचं. १४ वर्षांची मुलगी आई-वडिलांना सोडून अनोळखी व्यक्तीसोबत जाते; तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल... तुमचं १४ वर्षांचे वय हे विवाह करण्याचे आहे काय ? , नंतर पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर मुलगी आई-वडिलांना ओळखत नाही, असे म्हणत प्रा. हंकारे यांनी आई-वडिलांचं नातं निष्ठेने जपावं, असे आवाहन तरुणाईला केले. अन्  मुली गहिवरल्या. मुला -मुलींनी क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता शैक्षणिक पात्रता, आर्थिक क्षमता निर्माण करून एकमेकांच्या कुटुंबातील संमतीने लग्न करावे, असे व्याख्याते प्रा.वसंत हंकारे म्हणाले. विविध क्षेत्रातील उदाहरणे देत प्रारंभी विनोदनंतर भावनिक होऊन त्यांनी उपस्थित महिला, मुली व पालक यांच्या काळजाचा ठाव घेत बाप समजून घेताना विचार मांडले. बापाविषयीचा जिव्हाळा सांगताना मुलींना, महिलांना व उपस्थितांना रडू कोसळले. सदर व्याख्यानाला तोबा गर्दी उसळली होती.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन योगेश चौधरी यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने