बाजार समितीची मार्केट सेस व शासनाची सु.फी बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांना ११ हजाराचा दंड ..चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचा जोरदार दणका

 बाजार समितीची मार्केट सेस व शासनाची सु.फी बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांना ११ हजाराचा दंड ..चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचा  जोरदार दणका 


चोपडा दि.१३(प्रतिनिधी):  चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सु.फी.बुडवून पळून जाण्याच्या इराद्यात असणाऱ्या  व्यापाऱ्यांचे वाहन पडून व्यापाऱ्यांकडून ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.यापुढे चेक नाक्यावरील फी  बुडविण्याचा  प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सभापती नरेंद्र वसंतराव पाटील यांनी दिला आहे.

चोपडा तालुक्यातील बुधगांव चेक पोस्ट येथे दिनांक १२/१२/२०२४ वार गुरुवार रोजी बाजार समितीचे मार्केट सेस  मुकटी येथिल व्यापारी  श्री. भगवान खंडू सुर्यवशी, समाधान पंढरीनाथ पाटील व आप्पा कौतिक पाटील या व्यापाऱ्यांनी  भरण्यास नकार दिला व बाजार समितीचे कर्मचारी यांना अरेरावी ची भाषा वापरली त्या नंतर घटनास्थळी बाजार समितीचे संचालक श्री. विजय शालीकराव पाटील व बाजार समितीतुन सचिव आर.बी.सोनवणे, उपसचिव जे.एस.देशमुख, एन.आर. सोनवणे, लिपीक राकेश पाटील, योगेश निकम, निकीतेश पाटील, अशोक पवार, हे पथक  दाखल होवून सदरचे व्यापाऱ्याचे वाहन एम.एच.२० - १३५३ बाजार समितीचे मुख्य मार्केट यार्डात आणुन सदर व्यापाऱ्याकडून ११ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यांत आल्याची कारवाई झाली.

दरम्यान सभापती श्री. नरेंद्र वसंतराव पाटील यांनी  बाजार समितीच्या चेक नाक्यावर बाजार फी बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर यापुढे अशी दंडामक्त कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यांत येईल असा इशारा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने