बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन
♦️उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय ऐरंडोल व वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम
धरणगाव,दि.१४(प्रतिनिधी): आज दिनांक:12/12/2024 रोजी जिल्हाअधिकारी श्री.आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार श्री. मनीष कुमार गायकवाड-( प्रान्त)उपविभागीय दंडाधिकारी हांच्या हस्ते बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन करण्यात आले.
बाल विवाह प्रतिबंध कायदा -2006 ची चळवळी. या बाल विवाह थांबविणे व लोकान मध्ये जन जागृती निर्माण करने तसेच पहिले प्रबोधन, प्रतिबंधन व जन जागरूकता ह्या प्रणाम प्रत्येक गावात पालन करने आणि बाल विवाह रोखथामा करीता दक्षता समिति बनवीण्यात येईल गाँव, ब्लॉक स्तरावर व प्रत्येक 15 दिवसानी आराखड़ा घेण्यात येईल असे श्री. मनीष कुमार गायकवाड यांनी आपल्या भाषनात सांगितले
त्याच प्रमाणे श्री. जीतेन्द्र गोरे -प्रकल्प अधिकारी वर्ल्ड विज़न इंडिया धरणगाव यांनी आपले अनुभव सांगितले व आम्ही सर्व मिळून बाल विवाह सारखे समाजाचे वायरसाला मात देऊ शकतो व आपल्या पदाचा खरे वापर करू सकतो. त्याच प्रमाणे इवाक कॅम्पियान चे उद्घाटन करण्यात आले व गुड़ टच ब्याड टच या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.
वर्ल्ड व्हीज़न इंडिया च्या माध्यमाने शपथ विधि घेण्यात आली शेवटी हस्ताकक्षर अभियान राबविण्यात आले व उपस्थित सर्व लोकानी हस्ताकक्षर करुंन वचन दिले आपले कार्यक्रमात तीन्ही तालुका धरनगांव, परोला व ऐरोंडल चे वरिष्ठ अधिकारी वर्ग, तहसीलदार,गट विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस निरीक्षक , महिला व बाल विकास अधिकारी, सीडीपी,समस्त पोलिस पाटिल, सरपंच,वर्ल्ड व्हीज़न इंडिया चे समस्त टीम इत्यादि उपस्थित होते.