शिरपुर येथील महा शिवपुराण कथेसाठी चोपडा आगाराला भाविकांचा पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद
चोपडा,दि.2 (प्रतिनिधी) दिनांक १ डिसेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत शिरपुर येथे पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या मधुर वाणीतुन महा शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असल्याने, राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन कथेसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या पहिल्याच दिवशी भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.कथेच्या आदल्या दिवशी दिनांक ३० नोव्हेंबर रोजी दहा गाड्या तर पहील्या दिवशी दिनांक १ डिसेंबर रोजी २५ जादा बसेस सोडण्यात आल्या.भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मागणी नुसार पुरेसे प्रवाशी संख्या मिळाल्यास बस उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आगार प्रमुख महेंद्र पाटील दिली. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या नियोजनाने नितीन सोनवणे,सागर सावंत,डि डि चावरे, ईश्वर चौधरी,संजय सोनवणे, जितेंद्र पाटील, पंडीत बाविस्कर, नरेंद्र जोशी, भगवान नायदे, दिपक पाटील, अतुल पाटील, राजेंद्र सोये,आनंदा पाटील सह सुरक्षारक्षक चालक वाहक यांत्रिक परिश्रम घेत आहेत.