मुलांच्या विकास कामासाठी धर्म गुरूंनी घेतली गावाची जबाबदारी..
धरणगाव,दि.३० (प्रतिनिधी) : दिनांक २९/११/२०२४ रोजी धरणगाव येथे वर्ल्ड व्हिजन इंडिया या सेवा भावी संस्थेच्या वतीने सर्व जाती धर्म गुरूना सोबत घेऊन एक दिवशीय प्रशिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासा साठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे, राजेंद्र महाराज , अण्णा महाराज जांभोरे, सरपंच संगीताबाई पाटील भोणे व महेश महाराज व २२ गावातील भजनी मंडळ उपस्थित होते.प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी प्रशिक्षण दिले . एकूण ३८ लोकांनी या कार्यक्रमासाठी सहभाग घेतला.
वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी या वेळेस मार्गदर्शन केले , बाल विवाह थांबविणे , बालमजुरी थांबविणे, मुलांना चांगले शिक्षण देणे, चांगले आरोग्य , बालस्वरक्षण व मुलांचे सर्वांगीण विकास करणे या विषयावर मार्गदर्शन केले .
त्या मध्ये प्रशिक्षण मिटिंग साठी सर्व जाती धर्माचे गुरु महाराज ,सरपंच ,समाज सुधारक, व भजनी मंडळ यांनी एकत्रित येऊन मुलांच्या सर्वांगिक विकास कामासाठी धर्म गुरूनें घेतली जबाबदारी , त्या मध्ये मुलांचे सर्वांगीण विकास हा एक अति महत्वाचा भाग आहे . या विषया वर चर्चा व प्रशिक्षण घेण्यात आले. या मध्ये बालविवाह थांबवीने व लोकांमध्ये जनजागृती करणे , बालमजदूर थांबविणे , मुलांच्या स्वरक्षणाची जबाबदारी घेणे, शाळाबाहय मुलांना शाळेत पाठविणे , चांगल्या सवयी मुलांन मध्ये घडविणे, मुलांचं चांगले शिक्षणा साठी व चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्ने करणे , अशा विविध विषयांची जबाबदारी सर्व जाती धर्म गुरु , महाराज ,सरपंच ,समाज सुधारक, व भजनी मंडळ यांनी एकत्रित येऊन घेतली. या वेळी सूत्र संचालन वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव चे रतिलाल वळवी व अंकिता मेश्राम यांनी केला तसेच व स्वयंसेवक आरती पाटील , वैष्णवी पाटील , रचना जाधव व जितेंद्र पाटील या प्रशिक्षणा साठी परिश्रम घेतला . व २२ गावातील भजनी मंडळ २२ बालस्वरक्षण समितींनी सहभाग घेतला.