चोपडा येथील शिक्षणशास्त्र विद्यालयात 'संविधान दिन' साजरा*

 *चोपडा येथील शिक्षणशास्त्र विद्यालयात 'संविधान दिन'साजरा

चोपडा,दि.२७(प्रतिनिधी):येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्त्र विद्यालय विद्यालयात दिन.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी 'भारतीय संविधान दिन' साजरा करण्यात आला. 

या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील हे उपस्थित होते. यावेळी छात्र अध्यापकांनी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करून हा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी पायल ठाकरे व छात्रापक लक्ष्मीकांत महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. बी.एस.देवरे, प्रा. कु. प्रियंका जी.पाटील, प्रा.सौ. संगीता सोनवणे, प्रा. सौ. सुनिता चव्हाण, प्रा.विशाल पाटील आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रथम वर्षाची छात्र अध्यापिका जमुना थाटे हिने केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुस्कान तडवी या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी सुनंदा शिरसाठ व विपुल बाविस्कर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने