शा.ये.महाजन विद्यालयात संविधान दिवस साजरा
अडावद ता. चोपडा दि.२७(प्रतिनिधी)येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित शामराव येसो महाजन विद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला.
२६ रोजी दुपारी १२ वाजता संविधान दिवस विविध कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. त्यानंतर बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा अर्थात शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. बालविवाहाचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच याच दिवशी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, एन. ए. महाजन, व्ही. एम. महाजन, एस. जी. महाजन, एम.एन. माळी, पि. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस.पवार तर शिक्षकेतर कर्मचारी लिपिक सी.एस.महाजन, शिपाई ईश्वर मिस्तरी, रविंद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन आदी उपस्थित होते.