शिरपुर येथील महा शिवपुराण कथेसाठी चोपडा आगार जादा बसेस सोडण्यासाठी सज्ज

 

शिरपुर येथील महा शिवपुराण कथेसाठी चोपडा आगार जादा बसेस सोडण्यासाठी सज्ज


चोपडा,दि.२७ (प्रतिनिधी) दिनांक १ डिसेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत शिरपुर येथे पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या मधुर वाणीतुन महा शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असल्याने, राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन कथे साठी जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहीती आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली आहे. 

गेल्यावर्षी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख महेंद्र पाटील व त्यांच्या सर्व चालक /वाहक /यांत्रिक सहकाऱ्यांनी  वडनगरी जळगाव येथे झालेल्या महा शिवपुराण कथेसाठी चोपडा आगारातुन शिवभक्त भाविकांसाठी जादा बसेसचे नियोजन करून दर्जेदार सेवा देवुन भाविकांची कुठलीही गैर सोय न होवू देता विक्रमी उत्पन्न मिळवुन चोपडा आगाराचे नावलौकिक केले होते. याच अनुषंगाने शिरपुर येथे होणाऱ्या महाशिवपुराण कथे साठी चोपडा आगारातुन भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात येतील तसेच ज्या गावातुन ४५ प्रवाशी मिळतील त्यांच्या साठी स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येईल.तरी महाशिवपुराण कथेसाठी सोडण्यात येणाऱ्या जादा बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने