जळगाव जिल्ह्यात महायुतीचे साम्राज्य सर्व ११ जागेवर वर्चस्व.. पुन्हा तिन्ही मंत्री विजयी
जळगाव दि.23 नोव्हेंबर 2024(प्रतिनिधी): एक्झीट पोलनेराज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा दावा केलेला निकालाने फोल ठरला. राज्यात महायुतीची निर्विवाद सत्ता आली असून जळगाव जिल्ह्यात सर्वच 11 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. सर्वाधिक रंगत मुक्ताईनगरात होती मात्र येथेही महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा पराभव झाला तर महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा विजयी झाले.
विद्यमान आमदारांना मिळाली संधी
जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा या ठिकाणी पुन्हा विद्यमान आमदार मोठ्या मतांनी निवडून आले असून जिल्ह्यात सर्वत्र युतीचा झेंडा फडकला आहे.
दोस्तीतल्या कुस्तीत चाळीसगावात उन्मेषदादांनी मारली बाजी
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण व शिवसेना (उबाठा) गटाचे उन्मेश पाटील यांच्यात लढत झाली. यात आमदार मंगेशदादा चव्हाण विजयी झाले.
जळगाव ग्रामीण पालकमंत्र्यांचेच
जळगाव ग्रामीणमध्ये अत्यंत चुरशीच्या लढत शिवसेना शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.
जळगाव ग्रामीण पालकमंत्र्यांचेच
जळगाव ग्रामीणमध्ये अत्यंत चुरशीच्या लढत शिवसेना शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.
जामनेरात गिरीशभाऊंचीच हवा
जामनेरच्या चित्राबाबत विविध तर्क-वितर्क लढवले गेले मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी यांनी आपला किल्ला मजबूत करीत विजयाचा चौकार लगावला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रा. दिलीप खोडपे यांचा येथे पराभव झाला.
खडसेंच्या बालेकिल्याला हादरा: आमदार चंद्रकांतभाऊ पाटलांचा विजय
सर्वाधिक चुरशीची लढत ठरलेल्या व अपक्ष उमेदवारावर गोळीबारामुळे चर्चेत आलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील विजयी ठरले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गटाच्या प्रदेश उपाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा पराभव केला.
पाचोऱ्यात पुन्हा किशोर आप्पा
पाचोऱ्यात आप्पांनी मारली बाजी पाचोरा येथेदेखील लक्षवेधी लढत झाली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विजयाची पताका फडकवत अपक्ष उमेदवार अमोल शिंदे व उबाठा गटातील वैशाली पाटील यांचा पराभव केला.
चोपड्यात प्रा. चंद्रकांत सोनवणेंची सरशी कुटुंबात तिसऱ्यांदा आमदारकी
चोपड्यात चंद्रकांत सोनवणे विजयी चोपड्यात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत सोनवणे व उबाठा गटाचे प्रभाकर सोनवणे यांच्यात सरळ लढत होऊन चंद्रकांत सोनवणे विजयी झाले.
रावेरात काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ उमलले : अमोल जावळेंना संधी
रावेरच्या आखाड्यात दोन आजी-माजी आमदार पूत्रांमध्ये चुरशीची लढत झाली. त्यात भाजपा- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे धनंजय चौधरी यांचा दारुण पराभव केला.
भुसावळात आमदार सावकारे यांचा विजयाचा चौकार
भुसावळकरांच्या मनामनात वसलेले आमदार संजय सावकारे यांनी अपेक्षेप्रमाणे भुसावळात विजयाचा चौकार मारला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेश मानवतकर यांचा त्यांनी तब्बल 47 हजार 459 मतांनी पराभव केला.
जळगाव शहरात आमदार राजूमामांचा दणदणीत विजय
जळगाव शहर मतदारसंघात भाजपाचे सुरेश राजू मामा भोळे यांचा विजय निश्चित मानला जात होता व कार्यकर्त्यांचा विश्वास निकालानंतर स्पष्टही झाला. आमदार राजूमामा भोळे यांनी मोठ्या मतांनी उबाठा गटाच्या जयश्री महाजन यांचा पराभव केला.
अमळनेरात अनिल पाटलांना पुन्हा संधी
अमळनेरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांनी अपक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी व काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांना पराभूत केले.
एरंडोलमध्ये अमोल पाटील यांना संधी
एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांनी माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला. सर्वाधिक अपक्षही या ठिकाणी नशीब आजमावत होते मात्र त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.