चोपडा विधानसभा मतदार संघात महायुतीचे प्रा.चंद्रकांत अण्णा सोनवणे यांचा दणदणीत विजय तर उबाठाचे प्रभाकर आप्पा सोनवणे पराभूत
♦️कार्यकर्त्यांचा गुलाल उधळण करत जल्लोष.. आता हॅटट्रिकमुळे मंत्री पदाचे दावेदार ..जनतेची अपेक्षा..!
चोपडा दि.२३ नोव्हेंबर २०२४ ( प्रतिनिधी )- चोपडा विधानसभा (S.T- 10) राखीव मतदारसंघात उबाठाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे तर शिंदे गटाचे माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्यात समोरा समोर लढत होती. यात शिंदेगटाचे प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी बाजी मारून दणदणीत विजय मिळवला आहे. चुरशीची लढतचा बाऊ केला गेला होता मात्र प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या धर्मपत्नि सौ.लताताई सोनवणे हे विद्यमान आमदार असल्याने त्यांच्या वतीतून करोडो रुपयांचा निधी आणून चोपडा तालुक्यात विकासगंगा आणली होती यांचं विकास कामाचा जोरावर प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विजय निश्चित होता. त्याच विकास कामावर त्यांनी मतदारांना कडून मतदान मागितले आणि त्याची मतदारांनी सुध्दा परतफेड करत प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना भरघोस मतदानाने निवडून दिले. चोपडा विधानसभा क्षेत्रात प्रथम फेरीला प्रभाकर आप्पा सोनवणे हे आघाडी वर होते मात्र दुसऱ्या फेरी पासून प्रा चंद्रकांत आण्णा सोनवणे यांनी आघाडी घेतली तर ती आघाडी शेवटची फेरी पर्यंत आघाडीच राहीली 24 फेरी अखेर प्रा.चंद्रकांत सोनवणे हे 32 हजार 313 आघाडी घेऊन विजयी झाले आहेत.आता मंत्री पदावर वर्णी लागावी अशी आशा मतदार संघातील जनतेतून व्यक्त केली जात आहे.
प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना एकूण 122826 मते मिळाली असुन तर प्रभाकर आप्पा सोनवणे यांना 90513 मते मिळाली आहेत तर युवराज बारेला -1295 मते , सुनिल भिल्ल 1601 मते, अमित तडवी 598 मते, अमीनाबा तडवी 324 मते, बाळु कोळी 331 मते, संभाजी सोनवणे 562 मते,हिरालाल कोळी 2118 मते मिळाली आहेत चोपडा विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ उमेदवार निवडणूकित उभे होते. तर 2420 इतक्या मतदारांनी आम्हाला कोणताही उमेदवार पसंद नाही म्हणजेच नोटाला मतदान केले आहे.प्रा.चंद्रकांत आण्णा सोनवणे हे आघाडीवर होते तो पर्यंतच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाके फोडून आनंद व्यक्त करत होते. जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करताना दिसत होते तर ढोलताश्याच्या गजरात विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या .
प्रा.चंद्रकांत सोनवणे हे आपल्या परिवारा सोबत मतमोजणी ठिकाणी विजयाचा प्रमाणपत्र घेण्यासाठी आले यावेळी त्याच्या धर्मपत्नि आमदार सौ.लताताई सोनवणे, श्यामभाऊ सोनवणे, नानाभाऊ सोनवणे, यांच्यासह गौरव सोनवणे, डॉ. अमृता सोनवणे परिवारा सोबतच आदी हजारो कार्यकर्ते समवेत आले तेव्हा मात्र कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला विजयी जयजयकारच्या घोषणा देत गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. मतमोजणी साठी 14 (राऊंड) टेबल ठेवण्यात आले होते.तर 5 टेबल पोस्टल मतदानासाठी तर 2 टेबल सैनिकच्या मतदानासाठी ठेवण्यात आले होते. 14 टेबलवर 24 फेऱ्या करण्यात आल्या होत्या.यावेळी (ऑफझरवर) निरीक्षक अभिषेक दुबे (IAS) निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक निर्णय नायब तहसिलदार सचिन बामडे, निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, तर इतर नायब तहसीलदार, नोडल अधिकारी, मुख्याधिकारी राहुल पाटील,गटविकास अधिकारी महेश पाटील,कृषी अधिकारी दीपक साळुंखे, यांनी निवडणूकीत इतर शेकडो कर्मचाऱ्यानी काम पाहिले.तर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे,ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी फौज फाट्या सह जोख बंदोबस्त ठेवण्यात आले.