चोपड्यात धनगर समाजाच्या वतीने सरकारला जागविण्यासाठी ढोल बजाव आंदोलन
चोपडादि.१६ (प्रतिनिधी)धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर धनगर समाज वेळोवेळी आंदोलन करत आहे उपोषण करत आहे त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे धनगर समाजाच्या जमातीचे आरक्षण संदर्भात अंमलबजावणी करावी यासाठी आज चोपडा तालुका धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले व राज्यभरात करण्यात येत आहे सदर आंदोलन ग्रामीण पोलीस स्टेशन पासून तहसील कार्यालय पर्यंत ढोल वाजवत व सरकारचे विरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये लहान बालकांपासून वयोवृद्ध नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारने आरक्षणाचे अंमलबजावणी नाही केल्यास येणारा काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला व जोपर्यंत आमच्या न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या लढा सुरू राहणार व आम्हाला आरक्षण न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार असेही धनगर समाजाच्या वतीने झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी बोल वाजून आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदाराने मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, अनिता सुनिल शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मोर्या क्रांतीचे आर सी भालेराव, चोसकाचे व्हाॅ चेअरमन गोपाल,माजी नगरसेवक महेंद्र धनगर धनगर,अरुण कंखरे, संदिप धनगर,डॉ अशोक कंखरे,डि एस धनगर,शाम धामोळे,भगवान नायदे, डॉ सुभाष शिरसाठ, दत्तु धनगर,हिरामण धनगर,अनिता शिरसाठ,संगिता शिरसाठ, हिराबाई शिरसाठ , हिराबाई शिरसाठ,अरुणा शिरसाठ शोभाबाई शिरसाठ, मालुबाई सांगोरे,सुरेखा सोनवणे, लताबाई शिरसाठ, आशाबाई धनगर,छाया शिरसाठ बबिता धनगर,भावलाल पाकळे,उमेश शिरसाठ,प्रविण सावळे, विश्राम तेले,प्रदिप नायदे,विनोद नायदे,राजु सोनवणे, नंदलाल धनगर, नितिन पाकळे,राहुल शिरसाठ,मगन बोरसे, संदिप बिर्हाडे, साहेबराव कंखरे भुपेंद्र धनगर, योगेश कंखरे, रमाकांत धनगर, नवल धनगर, सुरेश चिंचोरे, सचिन सांगोरे,सह तालुक्यातील समाजाचे सर्व पक्षीय नेते ,समाज बांधवांसह महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
