धरणगाव तालुक्याचे गट विकास अधिकारींचा सत्कार

 

धरणगाव तालुक्याचे गट विकास अधिकारींचा सत्कार
   


धरणगाव,दि.१६(प्रतिनिधी)तालुक्याचे गट विकास अधिकारी  वानखेडे  यांचा सत्कार राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे नुकताच करण्यात आला यावेळी   तुमच्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचे प्रयत्न करेन असे  आश्वासन त्यांनी दिले.
धरणगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग नोंदणी झाली पाहिजे तसेच प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. पंचायत समिती व जिल्हा परिषद 5% निधी आपण खर्च करू पंचायत समितीच्या योजना आपण राबवू तसेच तुमचे सहकार्य मला अपेक्षित आहे.असेही ते म्हणाले .
तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी   धरणगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये 5% निधी वाटप झालेला नाही दिव्यांगांचे घरकुल विषयी प्रश्न मांडून ग्रामपंचायत मध्ये आम्ही 5% निधी मधून घरपट्टी व पानपट्टीमध्ये 50% सूट देण्यात यावी असे सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष संजय पाटील , राजू चौधरी, रवींद्र काबरे ,रमेश नाना चौधरी, सोनाली व भारती , मोठ्या संख्येने पदाधिकारी  उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने