बालाजी रथोत्सव व देवी विसर्जन निमित्त जैन संघटनाकडून पाणपोई
चोपडा दि.१६( प्रतिनिधी)-- बालाजी रथोत्सव व दुर्गादेवी विसर्जन निमित्त भारतीय जैन संघटना तर्फे सालाबादा प्रमाणे यात्रेत आलेल्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी पाणपोई (मिनरल वॉटर) ची व्यवस्था करण्यात आली होती.
या मिनरल्स पाणीपोईचे उद्घाटन येथील जैन समाजाचे अध्यक्ष गुलाबचंदजी देसर्डा यांच्या हस्ते व दादावाडी ट्रस्टचे विश्वस्त दीपक राखेचा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अनेकांनी भारतीय जैन संघटनाचे कौतुक केले.
यावेळी भारतीय जैन संघटना चे अध्यक्षनिर्मल बोरा,सदस्य आदेश बरडीया,कोष्याअध्यक्ष अभय ब्रह्मेचा,मनन चोपड़ा,दर्शन देशलहरा , चेतन टाटिया,विपुल छाजेड़,संस्कार छाजेड़, कुशल बुरड,प्रेम चोपड़ा आदी उपस्थित होते.
