धनंजय देसाई यांची राज्यपाल नियुक्ती साठी अभिजीत आपटे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईदि.१६(प्रतिनिधी) : हिंदूतेजसुर्य धनंजय भाई देसाई यांना राज्यपाल नियुक्ती द्यावी असे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल यांना सहसंपादक अभिजीत आपटे यांनी पाठवलेले आहे.
हिंदूतेजसुर्य धनंजय भाई देसाई यांचे हिंदू धर्म जनजागृती साठी आजपर्यंतचे योगदान अतुलनीय आहे. महाराष्ट्रच नाही तर देशभरातील युवकांना त्यांनी अध्यात्मिक प्रेरणा दिलेली आहे.
महाराष्ट्रात नाथ संप्रदाय फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि नाथ संप्रदायाची महती आपल्या तेजस्वी वाणीने धनंजय देसाई समाजात पोहोचवत असतात आणि यामुळे संस्कारक्षम पिढी घडण्यास मदत होते. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे केवळ अफूची गोळी नाही. धर्म म्हणजे जीवन जगण्याची कला शिकवण्याचं माध्यम आहे. धर्म म्हणजे नियम धर्म म्हणजे कृतज्ञता परोपकार विवेक सद्बुद्धी संस्कार आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं माध्यम आहे. धर्म गरजेचा आहे जो संयम शिकवतो. आतताई पणे परधर्मावर दुसऱ्याच्या हक्कावर माणुसकीवर गदा आणणारे भूतदयेचा लवलेश नसणारे धर्माच्या नावाने जिहादी अतिरेक करणारे झुंड प्रवृत्तीचे असू शकतात. आणि सत्य रज तमोगुणांवर विजय मिळवणारा धर्म असतो. असे धार्मिक अधिष्ठान असणारे तपश्चर्येने स्वतःला सिद्ध केलेले सिद्ध पुरुष म्हणजे हिंदूतेजसूर्य धनंजय देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना विनंती आहे की त्यांनी धनंजय देसाई यांचा राज्यपाल पदासाठी विचार करावा असे पत्र अभिजीत आपटे सहसंपादक सन्मान महाराष्ट्र यांनी पाठवले आहे.
