आचारसंहिताचे काटेकोरपणे पालन करा व राजकीय होल्डिंग तात्काळ काढा..निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे


आचारसंहिताचे काटेकोरपणे पालन करा व राजकीय होल्डिंग तात्काळ काढा..निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे 

चोपडा,दि.१७(प्रतिनिधी.) केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केल्याने चोपडा मतदारसंघातील प्रशासन अलर्ट झाले आहे. आचारसंहितेचे कोटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतून करण्यात आल्या आहे. चोपडा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार थोरात, नायब तहसीलदार सचिन बाबंळे यांच्या उपस्थितीत चोपडा तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की चोपडा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघात तीन लाख २९ हजार ६७७ मतदार आहेत ३२७ मतदान केंद्र ३८ सेक्टर ऑफिसर नेमले गेले आहेत शहरी भागात ६५ मतदान केंद्र व ग्रामीण भागात २७५ मतदान केंद्र अतिदुर्गम भागात नऊ असे मतदान केंद्रे असल्याची माहिती त्यांनी दिली.

 केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचे तारीख जाहीर केल्याने चोपडा मतदारसंघातील प्रशासन अलर्ट झाले आहे चोपडा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे तहसीलदार थोरात नायब तहसीलदार सचिन बाबंळे यांच्या उपस्थितीत चोपडा तहसील February पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले

अतिदुर्गम भागात नऊ  मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी मोबाईल रेंज नाही त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झव॔र  नेमतो काही ठिकाणी व्हिडिओ ग्राफी करतो 50% मतदान केंद्रांवर वेब कॉस्टिंग होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने