आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची बैठक संपन्न ..
चोपडा,दि.१७( प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर झाल्याबरोबर चोपडा तहसील कार्यालयात चोपडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली. यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात विविध विभागांना निर्देश देण्यात आले. त्याच्या आचारसंहिता भंग होणार नाही याबाबत काळजी घेण्यासाठी शासनाच्या विविध विभागांना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी नायब तहसीलदार योगेश पाटील, सचिन बांबळे, चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार डीआर सैंदाणे महसूल चे नायब तहसीलदार रवींद्र जोशी चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यावल शहराचे पोलीस निरीक्षक महेंद्र ठाकूर सर्व विभागांचे विभाग प्रमुख, पदाधिकारी ,नोडल अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी, पोलीस पाटील, बीएलओ उपस्थित होते