आ.किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते पाचोऱ्यात महामुनी महर्षी वाल्मिकी ऋषी महाराज मंदीराचे‌ भुमीपूजन

 

आ.किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते पाचोऱ्यात महामुनी महर्षी वाल्मिकी ऋषी महाराज मंदीराचे‌ भुमीपूजन

पाचोरा दि.१७(प्रतिनिधी ) पाचोरा शहरात रामायणकार महामुनी महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या मंदीराचे‌ भुमीपुजन आ.किशोर आप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते  मोठ्या धुमधडाक्यात  संपन्न झाले .
काल रामायणकार महामुनी महर्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,याच शुभमुहूर्तावर गिरणा पंपिंग रोडवर एकदंत रेसीडन्सी येथे महर्षी वाल्मिकी महाराज मंदीराचे भुमीपुजन आ.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.पाचोरा-भडगाव शहर व ग्रामीण भागातील सकल कोळी समाज बांधव व महिला भगिनींनी गावागावात महर्षी वाल्मिकी जयंतीची तयारी केली असतांना भुमीपुजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती दिली .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने