शामराव महाजन विद्यालयात 'वाचन प्रेरणा दिवस' साजरा
अडावद दि.१७(प्रतिनिधी)येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित शामराव येसो महाजन विद्यालयात 'वाचन प्रेरणा दिवस' व 'जागतिक हात धुवा दिवस ' उत्साहात साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फर्तपणे सहभाग घेतला.
१५ रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त वाचन प्रेरणा दिवस असल्याने यात विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तके वगळता अवांतर पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिवस साजरा करीत डॉ डॉ ए.पि.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी कलाम यांच्या बद्दल सविस्तर माहिती व्ही.एम.महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना दिली.
याच दिवशी जागतिक हात धुवा दिवस असल्याने आपले हात कसे स्वच्छ ठेवावेत यासाठी हात धुण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवण्यात आले व त्या पद्धतीने आपण प्रत्येक वेळी हात धुतले पाहिजे असे आवाहन मुख्याध्यापक आर.के. पिंपरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मुख्याध्यापक आर.के. पिंपरे, व्ही. एम. महाजन, एन. ए.महाजन, एस.जी. महाजन, एम.एन. माळी , पि. आर. माळी, एस.बी. चव्हाण. एस. के.महाजन, पि.एस.पवार, सी.एस.महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधूंचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन पि.आर.माळी यांनी तर आभार एन. ए. महाजन यांनी व्यक्त केले.