महाजन क्लासेसच्या वतीने कन्या पूजन..शैक्षणिक गुणव‌त्ता वाढीसोबत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व सांस्कृतिक शिकवण रुजविण्याचे कार्य


महाजन क्लासेसच्या वतीने कन्या पूजन..शैक्षणिक गुणव‌त्ता वाढीसोबत विद्यार्थ्यांमध्ये  सामाजिक व सांस्कृतिक शिकवण रुजविण्याचे कार्य

चोपडा,दि.१७(प्रतिनिधी) शैक्षणिक विचारांची देवाण घेवाण लहानपणापासून होत असते. माणुस शैक्षणिक विचारांनी मोठा होत जातो परंतु त्याचा वटवृक्ष हा सामाजिक  सांस्कृतिक खतपाणी घातल्याशिवाय होत नाही.  हा उद्देश  डोळ्यासमोर ठेवून चोपडयातील महाजन इंग्लिश क्लासेसच्यावतीने कन्या पूजन कार्यक्रम पार पडला.
क्लासेसचे  विद‌यार्थी शैक्षणिक प्रगतीत नेहमी अव्वल स्थानी असतात परंतु  सामाजिक कार्यात देखील हातभार लावावा या उद्देशाने श्री दिपक महाजनसर नेह‌मी प्रयत्नशिल असतात.. परमेश्वराने मानवी देह जसा दिला आहे तसा दातृत्वाचे अंग देखील त्याला दिले आहे. नवरात्रीच्या कालखंडात पुण्य, दान, परोपकाराने देवीची उपासना करण्याची वेळ असते हे ध्यानी घेऊन  श्री महाजन सरांनी वर्गात 'कन्यापूजन करण्याचा कार्यक्रम ठेवला होता. लहान मुली या देवीची शक्तीची रूपे असतात.त्यामुळे त्यांचे पूजन करण्यात आले. दानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक गुणांची रुजवण होत असते
शिस्त, अभ्यास, गुणवत्ता यासोबत क्लास सामाजिक कार्यात नेहमी सलोखा जोपासण्याचे काम करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने