अ.भा.कोळी समाज धुळे शाखेतर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

 अ.भा.कोळी समाज धुळे शाखेतर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

धुळे दि.२०(प्रतिनिधी)अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखेच्या धुळे शाखेतर्फे महामुनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी महाराज यांची जयंती मोठ्या भक्ती भावाने धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.

प्रारंभी साई सुंदर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुशीलजी नवसारे, सुशील नवसारे व पत्नी सौ. दिपाली नवसारे व दरबारसिंग गिरासे यांच्या शुभहस्ते महर्षी वाल्मिकी ऋषी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली तसेच महर्षीजींच्या पौराणिक कथेला उजाडा देण्यात आला.त्यानंतर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी अखिल भारतीय कोळी समाज धुळे शाखेचे जिल्हाध्यक्ष गिरीधर महाले ,शहराध्यक्ष वानू ताई शिरसाट , देविदास नवसारे दिलीप बागुल, सखाराम शिरसाट, अजय बागुल, नरेंद्र शिरसाट, कैलास कोळी ,महादू महाले, हेमराज कोळी, संदीप तवंर ,रवी कोळी, डॉ. अनिल बोरसे, रावसाहेब सैंदाणे, जगन सोनवणे, संजय शिंदे , साहेबराव कोळी,राहुल सैंदाणे ,कैलास चव्हाण, ॲड. अर्जुन महाले, भालचंद्र सोनवणे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने