चोपड्यात जवळपास २ लाख रुपयांच्या गुटखा जप्त

 चोपड्यात जवळपास २  लाख रुपयांच्या गुटखा जप्त


चोपडादि.२४( प्रतिनिधी) -- पोलिसांना गुप्त माहिती वरून मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी अधिक तपास करीत अचानक पने सदरील इसमाचा घरी धाड टाकली असता दि. 24 रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास मोहम्मद कादिश शेख आयुब वय 38 राहणार केजीएन कॉलनी नायरा पेट्रोल पंप च्या मागील गल्लीमध्ये राहत असलेल्या घरात घराच्या बाजूस असलेल्या गोडाऊन मध्ये प्रतिबंध असलेल्या पान मसाला व सुंगधीत तंबाखू / जर्दा रू.1,87,380 रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आले पहाटेलाच  विक्री करतांना आढळून आल्याने चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरील इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.

  पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी साो. यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या प्रमाणे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मधुकर साळवे, व त्यांचे सोबत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे  प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. अधिक चा तपास पोलीस करीत आहे.अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगावश्रीमती कविता नेरकर (पवार)  तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा  आण्णासाहेब घोलप,    पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स.पो.नि एकनाथ भिसे, पो.उ.नि. अनिल भुसारे, पो.उ.नि. जितेंद्र वालटे, पो.उ.नि श्री. विजय देवरे, पो.उ.नि श्री. योगेश्वर हिरे, स.पो.उ.नि जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, पोहेको शिपी, पोहेकों ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, पोको प्रकाश मथुरे, पोकों प्रमोद पवार, पोको विनोद पाटील, पोकों अमोल पवार, पोकों मदन पावरा, पोकों रजनिकांत भास्कर, पोकों अक्षय सुर्यवंशी, पोकों समा तडवी अशांनी सदरची कारवाई केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने