29 रोजी जननायक धडाकेबाज महायुतीचे उमेदवार अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे उमेदवारी अर्ज भरणार ..
चोपडा दि.२४ (प्रतिनिधी):चोपडा विधानसभेचे महायुतीचे धडाडीचे धडाकेबाज जननायक उमेदवार प्रा.चंद्रकांत अण्णा सोनवणें हे मंगळवार,दि.२९/१०/२०२४ रोजी सकाळी :१०=३०वाजता मॉं भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालयात हजारोंच्या जन आर्शिवादाने आपले उमेदवारीचे नामांकन पत्र दाखल करीत आहेत.
चोपडा शहरातील आई आनंदी भवानी मंदिर चोपडा येथून देवी भवानी मातेचे दर्शन घेऊन बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय चोपडा येथे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील .
तरी तमाम जनतेने आपल्या जननायक नेत्यांचा विजयी शुभारंभाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी हजारोंच्या संख्येने महाकाय रॅलीत आपणच स्वतः उमेदवार आहेत मानून सहभागी होऊन अण्णासाहेब हात बळकट करावेत असे आवाहन भाजप,शिवसेना व राष्ट्रवादी (अजित दादा पवार गट) पक्ष , कार्यकर्ते पदाधिकारी,बुथ प्रमुख,वार्ड प्रमुख सर्व पदाधिकारी, स्नेहीजन , हितचिंतक व नागरिक महायुतीचे चोपडा विधानसभा मतदार संघाचे सर्व कार्यकर्त्यांनी केलेआहे