अडावद येथे पी. एम. विश्वकर्मा प्रशिक्षणास उत्कृष्ठ प्रतिसाद

 अडावद येथे पी. एम. विश्वकर्मा प्रशिक्षणास उत्कृष्ठ प्रतिसाद 


अडावद ता.चोपडादि.24(प्रतिनिधी)  देशातील सर्व सामान्य लोकांना पाठबळ देण्या साठी भारत सरकार पि. एम. विश्वकर्मा उपक्रम सर्व देशात राबवत आहे यात सुतार काम, शिवण काम, लेडीज ब्युटी पार्लर या व्यवसायांचा समावेश असतो यात प्रत्येक कामगारांना  व्यवसाय करण्यासाठी उत्तेजना मिळते त्यांच्या विशिष्ट कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील मिळते कामावर जर काही अपघात झाला त्यांच्या पाश्चात तीन लाखापर्यंत विमा देखील दिला जातो या प्रशिक्षणात सर्व टेक्निकल गोष्टींचा अभ्यास केला जातो.

     अडावद येथे शुभारंभ मंडपम येथे प्रशिक्षण चालू असून पी.एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत या प्रशिक्षणात सर्व कारागीर कलाकृत लोकांना आपला व्यवसाय कसा वाढवावा आपल्याला व्यवसाय करण्यासाठी पैसा कुठून उभा करायचा या गोष्टी संदर्भात माहिती या ट्रेनिंगचे हेड अभिषेक देशमुख यांनी प्रशिक्षणार्थींना दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने