चोपडा उध्दव ठाकरे गटाचे दिग्गज कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश..महायुतीचे उमेदवार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची आतापासूनच विजयाकडे घोडदौड.. महा मेळाव्यात लोटला जनसागर
चोपडा दि.२३(प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांची उमेदवारी जाहीर होताच पहिल्याच दिवशी त्यांच्यावर प्रेम करणारा मोठ्ठ्या गटाचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे) धुरंधर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिंदे गटात सामील होऊन शिवबंध बांधून अण्णा साहेबांचे हात मजबूत केले आहेत.या जंगी सोहळ्याने चोपड्याच्या राजकारणात कलाटणी मिळाली आहे.माजी नगरसेवक किशोर चौधरी, राजेंद्र पाटील ऊर्फ राजू बिटवा, माजी नगरसेवक महेंद्र धनगर, दीपक माळी ,धीरज गुजराथी आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
संस्कार हॉलमध्ये आयोजित शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी,बुध प्रमुख व यांच्या महामेळाव्यात शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्ते ,पदाधिकारींनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.यात चोपडा येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील बिटवा ,शहर प्रमुख किशोर चौधरी, धीरज गुजराथी, युवा सेनेचे शहराध्यक्ष दीपक माळी, महिला आघाडीचे तालुकाप्रमुख मीनाताई शिरसाठ, वासुदेव महाजन, प्रतिभा महाजन, निखिल शिरसाट आदि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सौ लताताई सोनवणे व शिवसेना भाजप राषट्रवादी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक श्री चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी त्यांचे जोरदार स्वागत करून सत्कार केला.यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.