चोपडयात कारमध्ये सापडली तब्बल 30 लाखांची रोकड ..उपकोषागारात होणार जमा होणार जमा : निवडणूक निर्णय अधिकारींची माहिती
चोपडा (प्रतिनिधी) - दि.२४/१०/२०२४ रोजी मध्य रात्री च्या सुमारास तिरंगा चौक श्रीनाथ प्राईड येथे होंडाई व्हेन्यू कंपनीची गाडीत तीस लाख रुपयांची रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांकडून नाका बंदी तपासणी केली जात असतांना हा प्रकार उघडकीस आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.हि रक्कम कोणाची आणि कुठे घेऊन जात होते हे अद्यापी समोर आले नसून निवडणूक पार्श्वभूमीवर उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.लवकरच सत्यता उघड होईल असा दावा पोलिसांनी केला आहे.
घटनेतील गाडी होंडाई व्हेन्यू कंपनीची क्रमांक MP 09 -CK 7474 असा असून हिच्या मध्ये 30,00000 रुपये रोकड मिळून आली त्यात 500 रुपये दराचे 15, लाख रुपये,तर 200 रुपये दराचे 6 लाख रुपये, आणि 100 रुपये दराचे 9, लाख रुपये) अशी रोकड आहे ती रक्कम जप्त करण्यात आली आहे.
नामे इम्रान अल्लाउददीन मन्सुरी (वय ४४ रा. बलवाडी ता. वरला जि. बडवाणी मध्यप्रदेश) व अजय अरुण पाटील (वय ३२ रा. जयहिंद कॉलनी चोपड़ा ) हे दोघे वरील रोकड रक्कम घेऊन चोपडा मार्गे जळगाव कडे जात असताना तिरंगा चौकात श्रीनाथ प्राईड होटेल समोर मिळून आले आहेत. याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे.
दरम्यान सार्वत्रिक निवडणूक विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मधुकर साळवे, व त्यांचे सोबत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नाका तपासणी करीत असताना हा प्रकार उघडकीस आला.चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. सदर रोकड कुठून कुठे घेऊन जात होते आणि ही रोकड कोणाची ? हिचा खरा मालक कोण ? याबाबत शहरात उलट सुलट चर्चा असून याची कसून चौकशी पोलीस करीत आहे. ही रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात येईल अशी माहिती निवडणूक अधिकारी पाटोळे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर (पवार) तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स.पो.नि एकनाथ भिसे, पो.उ.नि. अनिल भुसारे, पो.उ.नि. जितेंद्र वालटे, पो.उ.नि श्री. विजय देवरे, पो.उ.नि श्री. योगेश्वर हिरे, स.पो.उ.नि जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, पोहेको शिपी, पोहेकों ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, पोको प्रकाश मथुरे, पोकों प्रमोद पवार, पोको विनोद पाटील, पोकों अमोल पवार, पोकों मदन पावरा, पोकों रजनिकांत भास्कर, पोकों अक्षय सुर्यवंशी, पोकों समा तडवी यांनी केली आहे.