लाडकी बहीण योजना प्रत्येक घरात पोहचवा..शिवदुत,बुथप्रमुख ,बी.एल.ओ. व शिवसैनिकांच्या बैठकीत निर्णय

 लाडकी बहीण योजना प्रत्येक घरात पोहचवा..शिवदुत,बुथप्रमुख ,बी.एल.ओ. व  शिवसैनिकांच्या बैठकीत निर्णय 

चोपडा दि.२६(प्रतिनिधी)दिनांक २५/०९/२०२४ रोजी बोथरा मंगल कार्यालय चोपडा येथे माजी  आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व आ. सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत शिवदुत,बुथप्रमुख ,बी.एल.ओ. व  शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात मागऀदशऀन करताना  निवडणुकीत सुक्ष्म नियोजन करुन प्रत्येक मतदारांपर्यंत शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण,तसेच सर्व लाभदायक योजनांची माहिती पोहचवुन वंचित लोकांना लाभ मिळवून द्यावा असे सांगून  मतदारसंघातील विकास कामांची माहिती उपस्थितांना दिली व योगेश्वर पुरोहित यांनी बूथ प्रमुख व शिवदूत कार्यकर्ते यांना येणाऱ्या विधानसभा इलेक्शन बद्दल माहिती देत मार्गदर्शन केले

यावेळी वासुदेव पाटील साहेब जिल्हाध्यक्ष, नानाभाऊ सोनवणे, नरेंद्र पाटील सभापती कृ. उ. बा. स.चोपडा, बबलूभाऊ कोळी उपसभापती यावल, सौ. मंगलाताई पाटील, एम.व्ही पाटील सर, रावसाहेब पाटील, गोपाल पाटील, राजेंद्र पाटील, विकास पाटील, सूर्यभान पाटील सर, भरत चौधरी सर, गोपाल चौधरी, शिवराज पाटील, सागर ओतारी, किरण देवराज, इम्रान खाटीक, विजय पाटील, राजेंद्र जैस्वाल, राजेंद्र पाटील, शीतलताई देवराज, मा. गंभीर सर, भबूतअण्णा पाटील हे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने