कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिवेशन : ऍड बाळकृष्ण पाटील

 कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिवेशन : ऍड बाळकृष्ण पाटील

गणपूर(ता चोपडा)ता 26: राज्यातील शासकिय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ, महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन उद्या (ता 27) शुक्रवारी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठा जवळील हिंदुस्थान ऍग्रो कंपनीच्या आवारात दुपारी दोन वाजता होणार आहे. 

अधिवेशनाचे उद्घाटन  मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होणार असून  उप मुख्यमंत्री अजितदादा पवार,देवेंद्र फडणवीस,कृषिमंत्री धनंजय मुंढे,व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या अधिवेशनासाठी राज्यातून सुमारे 3000 कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी सपत्नीक उपस्थित राहतील.त्यात खानदेशातून सुमारे 300 शेतकरी हजेरी लावतील अशी माहिती राज्यकार्यकारिणी सदस्य ऍड बाळकृष्ण पाटील,जळगाव जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील,दिलीप पाटील, यांनी दिली.तर विविध निवेदने देण्यासाठी व सत्कारासाठी सभासदांनी प्रचंड संख्येने उपस्थिती देण्यासह अधिवेशनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संघाचे राज्याचे अध्यक्ष कृषिभूषण ऍड प्रकाश पाटील (पढावद) कार्याध्यक्ष कृषिभूषण नाथराव कराड(बीड), उपाध्यक्ष कृषिभूषण सदाशिव थोरात (परभणी), उपाध्यक्ष प्रल्हाद वरे (बारामती), सचिव संदीप नवले(पुणे) यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने