चोपडा फार्मसी च्या शिरपेचात मानाचा तुरा ..महाविद्यालयास नॅक ची B++ श्रेणी प्राप्त..

 चोपडा फार्मसी च्या शिरपेचात मानाचा तुरा ..महाविद्यालयास नॅक ची B++  श्रेणी प्राप्त..

चोपडा दि.२५(प्रतिनिधी)येतील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधंनिर्माणशास्त्र महाविद्यालयास नॅक ची B++ (CGPA 2.99)श्रेणी प्राप्त झाली आहे. चोपडा फार्मसी गेल्या तीन दशकापासून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यात अग्रेसर आहे त्याची परिणीती म्हणून महाविद्यालयास तीन वेळा एनबीए व या वर्षी पुढील ५ वर्षासाठी नॅक ची B++ ( CGPA 2.99 ).श्रेणी प्राप्त झाली आहे. दि १३ जुलै व १४ जुलै २०२४ रोजी महाविद्यालयास नॅक च्या त्रि सदस्यीय समिती ने भेट दिली होती.समितीचे अध्यक्ष प्रा डॉ राकेश कुमार शर्मा   (हरियाणा) समिती सदस्या प्रा डॉ श्रीदेवी आदिकाय (आंध्रप्रदेश) व डॉ के नागा वेंकटेश्वरा राव  (तेलंगणा) यांचा समावेश होता. समितीने दोन दिवसात महाविद्यालयातील विविध विभागाचे निरीक्षण केले व विविध कागदपत्राची पडताळणी केली.याच सोबत संस्थेने देऊ केलेल्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला. मान्यवरांनी जनशिक्षिण संस्था चोपडा येते सुद्धा भेट दिली. समिती सदस्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष ऍड भैय्यासाहेब संदीप पाटील व सचिव डॉ सौ स्मिताताई यांनी केले.महाविद्यालयाच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा व विविध विभागांचे सादरीकरण प्राचार्य प्रा डॉ गौतम वडनेरे यांनी केले. नॅक समन्वयक प्रा डॉ मो रागीब मो उस्मान , सहयोगी समन्वयक प्रा डॉ भरत जैन , HOD प्रा डॉ.  संदीप पवार,प्रा. के सी पाटील , प्रा नलिनी मोरे, IQAC सेल च्या प्रमुख प्रा डॉ स्वर्णलता महाजन , ट्रेनिंग व प्लेसमेंट च्या प्रा डॉ प्रेरणा महाजन, शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा डॉ तन्वीर शेख, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ.  किरण बाविस्कर प्रबंधक श्री प्रफुल्ल मोरे यांनी आपल्या विभागाची सविस्तर माहिती सादर केली. समिती सदस्यांनी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी, पालक व mou पार्टनर तसेच विद्यार्थी  यांच्याशी संवाद साधला. नॅक समितीचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रबंधक , विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींचे सहकार्य लाभले.

.......................................................................

आमचे फार्मसी महाविद्यालय गेल्या तीन दशकापासून चोपडा तालुक्यातील व जिल्ह्यातील  सर्व घटकांना शिक्षण देण्यात कार्यरत आहे सोबत  गुणवत्ता पूर्वक फार्मसीचे शिक्षण देत असून आजचे मिळालेले यश हे त्याचेच परिणाम आहेत.महाविद्यालय हे विद्यार्थी केंद्र बिंदू मानून कार्यरत असते व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटत असते.

ऍड संदीप पाटील 

अध्यक्ष महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा

.......................................................................

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने