प्राचार्य डॉ. प्रकाश लोहार यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान

 प्राचार्य डॉ. प्रकाश लोहार यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान

    शिंदखेडा ,दि.७(प्रतिनिधी) : श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे श्रीमती पी बी बागल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय दोंडाईचा ता. शिंदखेडा, जि‌. धुळे येथील प्राचार्य डॉ प्रकाश लोहार यांचा आद्यशिक्षक सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य त्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील  शैक्षणिक, संशोधन, प्रकाशन क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्यकर्तृत्वाबद्दल तसेच त्यांच्या माध्यमातून बागल महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल दोंडाईचा येथे रोटरी क्लब तर्फे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोंडाईचा रोटरी क्लब चे अध्यक्ष श्रीयुत पंकज कवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रोजेक्ट चेअरमन डॉ. प्रवीण पाटील, श्री श्रीकांत इंदानी, श्री संजय निकम, गुलाम रसूल शेख, अनिश शाह, राकेश जयस्वाल, ब्रिजेश अग्रवाल, इत्यादी रोटरी क्लबचे विविध पदाधिकारी हजर होते.

        पीडीजी श्रीकांत इंदानी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक हा समाजाचा कणा आहे. मार्गदर्शक म्हणून पिढी घडवण्याचे कार्य पूर्णपणे शिक्षकाकडे आहे. शिक्षकाने चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपले आयुष्य वेचले पाहिजे. आजीवन जीवन सेवावृत्ती ठेवावी. शिक्षक हा एक उत्तम व्यवसाय आहे. समाजातील सर्व व्यवसायांमध्ये आदर्श मानला जाणारा व्यवसाय म्हणजे शिक्षक व्यवसाय होय. म्हणून शिक्षकांनी आपले पावित्र्य जपावे असे श्रीकांत यांनी सांगितले.

          सत्कारमूर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश लोहार यांनी शिक्षक एक सेवा व्रत आहे. अंगी शिस्त बाळगून, क्षमतांचा विकास करत कर्तव्य बाजबित विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाशिवाय कोणताही देश पूर्ण नाही. आणि म्हणून शिक्षणाशिवाय देशाची प्रगती नाही. आजच्या काळात आधुनिक शिक्षण पद्धतीला महत्त्व दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होताना दिसून येते. शिक्षकांनी देखील आपल्या कार्यामध्ये नवनवीन अध्यापन पद्धतींचा, तंत्रांचा वापर करावा व विद्यार्थी शिक्षणाकडे आकर्षित होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत व शिक्षकांनी शिकण्याच व शिकवण्याचे कार्य अविरत सुरू ठेवावे असे प्राचार्य डॉ. प्रकाश लोहार यांनी विषद केले.

             रोटरी क्लब ने महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनींचा सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रवीण पाटील यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनीयर अनिश शहा यांनी केले व कार्यक्रमाचे आभार रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कवळ यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने