विरवाडा बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांस फाशी शिक्षा द्या..! आदिवासींचा मोर्चासह रस्ता रोको

 विरवाडा बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांस फाशी शिक्षा द्या..! आदिवासींचा मोर्चासह रस्ता रोको

चोपडा दि.६(प्रतिनिधी)विरवाडा येथे अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून निघृण हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढून पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. तिरंगा चौकात ठाण मांडून रोष व्यक्त केला. जवळपास 200 ते 300 आंदोलकांनी मारेकऱ्यांस फाशी द्या.. फाशी द्या..! अशा घोषणांनी परिसरात दणाणून सोडला यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

निवेदनात नमूद केले आहे की,चोपडा तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन 13 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याने संपूर्ण तालुका  हादरला आहे एकाच महिन्यात जिल्ह्यात  अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची तिसरी घटना असल्यामुळे  समाजात अत्यंत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.अशा घटनांमुळे फक्त पीडित कुटुंबच नाही, तर संपूर्ण समाजात भय आणि आक्रोश निर्माण झाला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी विकृत मानसिकता असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीही  तरतूद करावी तसेच जिल्ह्यातील अनेक आदिवासी समाजातील अशा घटना दाबल्या जातात त्यांना लगाम बसावा ,त्याचप्रमाणे आदिवासी पाड्यांवर  शाळा, महाविद्यालये आणि समाजातील विविध स्तरांवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती मोहिमा आणि सक्षमीकरण कार्यक्रम राबवावे असे  स्पष्ट केले आहे.निवेदनावर  डॉ.चंद्रकांत बारेला, अतुल ठाकरे, सचिन डाभे,दिलीप नेवे, प्रमोद बोरसे पाटील आदिंच्या  सह्या आहेत.

.......................................

 पिडीत कुटूंबियांच्या पाठीशी उभे राहणे हेच माणूस म्हणून प्रत्येकाचे काम :पोनि मधुकर साळवे 

आंदोलनकर्त्यांनी  समाजाबाबत  जागृती असले पाहिजे हे छान प्रकारे मांडले असून आपण माणूस म्हणून माणसाप्रमाणे वागून हा कोणत्या समाजाचा आणि तो कोणत्या समाजाचा असं न करता पिडीत कुटूंबियांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे या  गरिब कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे असे मत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी व्यक्त केले आहे

......................................

नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचीही न्याय व्यवस्था व्हावी : डॉ.चंद्रकांत बारेला

तेरा वर्षीय बालिकेचा मृतदेह जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेला पाहून मन सुन्न होते. हा अत्याचार एका मुलीवर नसून पूर्ण समाजावर आहे कुठेतरी हे थांबले पाहिजे. अशा विकृत लोकांसाठी असे कायदे करा की, त्यांना थांबायला वेळ न देता खटला फास्ट ट्रॅकने चालवून   फासावर लटकविले पाहिजे अशी मागणी डॉ.चंद्रकांत बारेला यांनी केली .यावेळी शेत मजूर महिलांनी शेतात जायचं कसं ? अशी भिती व्यक्त केल्याचाही खुलासा त्यांनी केला.

...............................‌....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने