अडावद येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपींचा पाच दिवसानंतर छडा लावण्यात पोलिसांना यश : चार जणांना अटक : १० पर्यंत पोलीस कोठडी

 अडावद येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपींचा पाच दिवसानंतर छडा लावण्यात पोलिसांना यश : चार जणांना अटक : १० पर्यंत पोलीस कोठडी 

चोपडा दि.07(प्रतिनिधी) तालुक्यातील अडावद येथील हजरत पिरपाकरशहा बाबाच्या दर्ग्याजवळ १ रोजी झालेल्या ४५ वर्षीय इसमाच्या खुनाच्या तपासात पाच दिवस कसून तपास केल्यानंतर चौघा आरोपितांना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. त्या चौघां आरोपींना चोपडा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

     पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार १ रोजी सकाळी १०.३० वा.चे सुमारास अडावद गावाचे सरपंच बबन तडवी यांनी अडावद पोलीस स्टेशन येथे फोन करुन माहिती दिली की, अडावद गावालगत असलेल्या हजरत पिरपाकरशा बाबाच्या दरग्या समोर एक इसम मयत स्थितित पडलेला आहे. अशी माहिती दिली असता अडावद पोलीसांनी तेथे जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी अंदाजे ४५ वर्ष वयाचा इसम मयत स्थितित पडलेला होता. तेव्हा पोलीसांनी आजु बाजुच्या लोकांना विचापुस केली असता सदर मयत इसम हा जगदिश फिरंग्या सोलंकी वय ४५ रा. पाटचारी अडावद ता. चोपडा जि. जळगाव असे असल्याची माहिती मिळाली पंचांसमक्ष पोलीसांनी इन्क्वेस्ट पंचनामा केला असता मयताच्या अंगावर ठिक ठिकाणी मारहाण झाल्याच्या व्रण दिसत होते. तसेच मयताच्या डोक्यावर, कपाळावर तसेच कानावर गंभीर जखमा दिसत होत्या तसेच कशाचे तरी सहाय्याने गळा आवळल्याचे व्रण दिसत होते.

      तरी सदर बाबत मयताचा मुलगा ईश्वर जगदिश सोलंकी वय २० रा.पाटचारी अडावद ता. चोपडा याचे फिर्यादवरुन अज्ञात आरोपी याचे विरुध्द अडावद पो.स्टे. गुन्हा रजि.नं.१५७/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      सदर गुन्हयाच्या तपासाचे अनुशंगाने  पोलीस अधिक्षक  महेश्वर रेडडी अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव  कविता नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा डॉ. कुणाल सोनवणे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड  यांनी भेट दिली तसेच सदर गुन्हयाच्या तपासाबाबत सुचना देवुन अज्ञात आरोपी यांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनरीक्षक वाघमारे व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत असतांना अडावद पोलीसांना गोपनिय  माहिती मिळाली की, पाटचारी जवळील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थान समोर पाटावर बसुन गांजा पिणारे इरफान अब्दुल तडवी (३२),  शहारुख इस्माईल तुडवी ( २३),  शेख मोईन शेख मजिद (२६), कलिंदर रशिद तडवी(२६) यांनी सदर मयतास ठार मारल्याची माहिती मिळाल्याने त्यांना संशयीत म्हणून ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी गांज्याच्या नशेत मयत यास शिविगाळ केली असता मयत हा त्यांना म्हणाला की, "तुम्ही गांजा पिणारे गंजोटी येथे का बसले आहेत ?"असे बोलल्याचा आरोपी यांना राग आल्याने त्यांनी मयत याच्या मोटार सायकलला लाथ मारुन खाली पाडले तेव्हा मयत हा पळु लागल्याने त्यास कब्रस्थान मधिल बांधकाम केलेल्या व्हरांडयात व रुममध्ये घेवुन गेले व तेथे लाठ्या काठयाने मारहाण केली तसेच आरोपी कलिंदर रशिद तडवी याने दोरीने गळा आवळुन ठार मारले तसेच प्रेत उचलुन हजरत पिरपाकरशा बाबाच्या दरग्या समोर आणुन टाकले आहे अशी माहिती दिली असल्याने सदरचा गुन्हा उघड झाला असुन आरोपी यांना अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १० पर्यंत पोलीस कोठडी दिली असुन सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस प्रमोद वाघ व अडावद पोलीस करित आहेत.

      या तपासात अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनरीक्षक राजू थोरात, सहायक फौजदार शरीफ तडवी, हवालदार भरत नाईक, शेषराव तोरे, अनवर तडवी, संजय धनगर, ज्ञानेश्वर सपकाळे, पोलीस शिपाई सतीश भोई, अक्षय पाटील, शुभम बाविस्कर, भुषण चव्हाण यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने