मी म्हातारा आहे हे मनातून आधी काढा :सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी टी चौधरी यांचे प्रतिपादन.. ♦️श्री नाटेश्वर ज्येष्ठ नागरीक संघाची स्थापना

 

मी म्हातारा आहे हे मनातून आधी  काढा :सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी टी चौधरी यांचे प्रतिपादन..

♦️श्री नाटेश्वर ज्येष्ठ नागरीक संघाची स्थापना

लासूर ता.चोपडादि.१७(वार्ताहर)- येथे नुकतीच श्री नाटेश्वर ज्येष्ठ नागरीक संघाची स्थापना संपन्न झाली.यानिमित्त उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन गावातील श्रीराम मंदिर आवारात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष जगतराव बारकु पाटील होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी टी चौधरी सर यांच्या हस्ते करण्यात आले.

       याप्रसंगी ज्येष्ठांचे जीवन कसे आनंदमय होईल व त्यांनी कोणती काळजी घ्यावी आपल्या पुढील जीवनात आनंदमय जीवन जगण्यासाठी स्वतःला मी म्हातारा आहे हे मनातून काढून टाकावे .कुटुंबाशी व नातवंडाशी सलोख्याने वागावे . समाजामध्ये मैत्री भाव निर्माण करावा आलेल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन करावेअसे प्रतिपादन श्री डी टी चौधरी यांनी केले याप्रसंगी एम बी महाजन,अरुणकुमार माळी,अरुण धांडे,विजय करोडपती,जयदेव देशमुख,विलास पाटील, जिजाबराव नेरपगारे,राजेंद्र बिडकर, इंजि विलास पाटील,दिलीप पाटील,रमेश ठाकूर,पी जी चौधरी,एस व्ही पाटील यांसह लासूर संघाचे अध्यक्ष श्रीराम पालीवाल,उपाध्यक्ष भालचंद्र पाटील,सचिव देविलाल बाविस्कर तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने