निर्मला सीतारामन जिएसटी जिझिया कराच्या शिरोमणी -ज्येष्ठ पत्रकार अभिजीत आपटे

 

निर्मला सीतारामन जिएसटी जिझिया कराच्या शिरोमणी -ज्येष्ठ पत्रकार अभिजीत आपटे


पु
णे,दि.१८(प्रतिनिधी): एक देश एक कर ही संकल्पना जिझिया करातुन जन्माला आली.भारतात कुतुबुद्दीन ऐबकने पहिल्यांदा जजिया लागू केला. सोळाव्या शतकात मुघल शासक अकबर याने जजिया रद्द केला होता. सतराव्या शतकात मुघल शासक औरंगजेब याने जजिया पुन्हा लागू केला.जिझिया, ऐतिहासिकदृष्ट्या, एक कर (या शब्दाचा अनेकदा अनुवाद "हेड टॅक्स" किंवा "पोल टॅक्स" म्हणून केला जातो) गैर-मुस्लिम लोकसंख्येने त्यांच्या मुस्लिम शासकांना दिलेला.

1564 मध्ये तिसरा मुघल सम्राट अकबर याने जिझिया रद्द केला होता. शेवटी 1579 मध्ये तो रद्द करण्यात आला. तथापि, सहाव्या सम्राट औरंगजेबाने 1679 मध्ये गैर-मुस्लिमांवर जिझिया पुन्हा लागू केला आणि लादला.

त्यानंतर थेट 2016 सालापासून स्वतंत्र हिंदुस्तान मध्ये जिझिया जिएसटी लागु करण्यात आला. वन नेशन वन टॅक्स जरी ही संकल्पना नरेंद्र मोदी यांनी आणली असली तरी दोन वेळा अर्थमंत्री असलेल्या निर्मला सितारामन यांनी एक देश अनेक टॅक्स स्लॅब च्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय ग्राहकांवर 5% पासून 28 % पर्यंत ते  1 जुलैपासून लागू होणाऱ्या प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर (GST) दरांनुसार गोड वातित पाणी आणि चवदार पाण्यावर एकूण 40%—28% कर आणि 12% अतिरिक्त उपकर आकारला जाईल. सध्या एरेटेड शीतपेयेवरील कर राज्यानुसार बदलतो. देशातील व्यापारी उद्योगपती आणि ग्राहक सर्वांना अडचणीत आणणारा हा जिझिया कर पेट्रोल डिझेल वर मात्र स्वतः च्या फायद्यासाठी लागु करण्यात आलेला नाही. सर्व सामान्य भारतीयांसाठी अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ टिकणारे अन्न उपलब्ध करून दिले जाते. खाद्यपदार्थांवर पॅकेजिंग शेतमालावर हा जिझिया कर लागू करणे म्हणजे भारतात हिंदू मोगल शाही माजवण्यासारखा आहे. ज्या देशात महात्मा गांधी यांनी नमक सत्याग्रह केला त्या मिठावर देखील स्वतंत्र हिंदुस्तान मधल्या निर्मला सितारामन यांनी 5% टॅक्स लावला आहे.या जिझिया कराच्या विरोधात बोलणारे हॉटेल व्यावसायिक तामिळनाडू चे श्रीनिवासन यांना माफी मागावी लागली.

केवळ जनतेला करांच्या माध्यमातून त्रस्त करून सोडणं, देशाची सार्वजनिक संपत्ती विकून यांची स्वप्न आणि मन की बात पूर्ण करणं यासाठी निर्मला सीतारामन अर्थशास्त्री म्हणून काम करत आहेत वास्तविक निर्मला सीतारामन यांना अर्थशास्त्र किती माहित आहे? की ते फक्त पुस्तकी ज्ञान आहे याबद्दल शंका आहे. अन्यथा 18 ट्रिलियन भारतीय अर्थव्यवस्थेला साडेतीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था तीही विदेशी गुंतवणुकीवर आधारलेली सार्वजनिक संपत्ती विकून आलेली आणि जीएसटी सारख्या करातून लोकांचे आर्थिकदृष्ट्या शोषण करून निर्मला सीतारामन या भारतीय अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियन पर्यंत नेण्याची स्वप्न बघत आहेत वास्तविक भारतीय अर्थव्यवस्थेची व्याप्ती अजून निर्मला सीतारामन यांना कळलेली नाही. अशी कठोर टीका देशभक्त जेष्ठ पत्रकार राजकीय व्युहरचनाकारणतिकार अभिजीत आपटे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने